फलटणमध्ये भविष्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान असणे गरजेचे : राहुल सिंग

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०३ मे २०२२ । फलटण । फलटण सारख्या ठिकाणी एवढे खेळाडू विविध खेळांमध्ये सहभाग घेतात हे पाहून आनंद झाला आहे. खेळांमध्ये सातत्य असणे फार गरजेचे आहे, त्याचप्रमाणे फलटण शहरामध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळाडू सहभागी होतात. परंतु जर फलटणमध्ये भविष्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान असणे गरजेचे आहे. फलटणच्या हॉकी खेळाडूंना पद्मश्री धनराज पिल्ले यांना घेऊन मी या खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहे, असे मत राहुल सिंग यांनी व्यक्त केले.

फलटण एज्युकेशन सोसायटी क्रीडा समिती मार्फत 15 एप्रिल 2022 ते 30 एप्रिल 2022 या दरम्यान उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नुकताच या शिबीराचा समारोप समारंभ श्रीमंत शिवाजीराजे क्रीडांगण (घडसोली मैदान) फलटण येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे 1996 अटलांटा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले राहुल सिंग यांच्या उपस्थितीमध्ये थाटात संपन्न झाला. या समारोप समारंभासाठी तालुका क्रीडा अधिकारी महेश खुटाळे, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम, मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य बी. एम. गंगवणे, उपप्राचार्य ए.वाय. ननवरे, श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या दिक्षित, फाळके, नसरीन, क्रीडा समितीचे सदस्य महादेव माने, सीनियर हॉकी खेळाडू महेंद्र जाधव, सुजित निंबाळकर, प्रवीण खाडे, सुमित मोहिते, सचिन लांळगे व क्रीडा समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

यावेळेस या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब यांनी खेळाडूंना या प्रशिक्षण शिबिरातून विद्यार्थ्यांना मैदानाची खेळाची आवड नक्कीच निर्माण झाले असेल असे सांगून या शिबिराचा इथून पुढच्या काळात अशाच पद्धतीने दररोज सराव करून आपल्या खेळांमध्ये प्रावीण्य मिळवावे असे आवाहन केले तसेच फलटण मध्ये इथून पुढच्या काळात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण होण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान लवकरात लवकर तयार करण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत असे सांगितले.

प्रारंभी श्रीमंत संजीवराजे यांनी क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे यांचा आवर्जून उल्लेख केला. ते फुटबॉल, हॉकी या दोन खेळांमध्ये तरबेज होते असे सांगितले व त्यांच्या बरोबर आम्ही देखील फुटबॉल हा खेळ खेळत होतो, असे सांगून आत्ता वयाच्या ऐंशीव्या वर्षी देखील तेवढ्याच जोमाने ते क्रीडाक्षेत्र पाहत आहेत असा उल्लेख त्यांनी केला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा समितीचे सदस्य तुषार मोहिते यांनी केले. प्रास्ताविक क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हॉकी ओलंपियन खेळाडू राहुल सिंग यांचा परिचय क्रीडा समितीचे सचिव सचिन धुमाळ यांनी करून दिला.

त्यानंतर शिबिरार्थी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले तसेच शिबिरार्थी विद्यार्थ्यांची मनोगते घेण्यात आली. 15 दिवसाच्या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरामध्ये तज्ञ क्रीडा मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले. त्यामध्ये खो-खोचे राष्ट्रीय प्रशिक्षक प्रशांत पवार, ऍथलेटिक्स या खेळासाठी राष्ट्रीय प्रशिक्षक राजगुरू कोथळे यांनी मार्गदर्शन केले. तसेच या शिबिराला आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू कुमारी अक्षदा ढेकळे व वैष्णवी फाळके यांनी देखील भेट देऊन सर्व खेळाडूंना मार्गदर्शन दिले.

या कार्यक्रमाचे आभार क्रीडा समितीचे सदस्य प्रा. तायाप्पा शेडगे यांनी केले. हे शिबिर पंधरा दिवस यशस्वी रित्या पार पडण्यासाठी संजय फडतरे, प्रा. स्वप्नील पाटील, राज जाधव, खुरंगे बी.बी., शिंदे वि. जी., बोराटे सर, सुळ सर, जाधव डि. एन, पवार सर, वाघमोडे सर, घोरपडे सर, कु. धनश्री क्षीरसागर, अमित काळे, अविनाश गंगतीरे, गव्हाणे मॅडम यांनी विशेष सहकार्य केले.


Back to top button
Don`t copy text!