फलटण नगरपालिकेची अशी प्रभाग रचना करा !; निवडणूक आयोगाचे निर्देश


दैनिक स्थैर्य | दि. 11 जून 2025 | फलटण | राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायतीच्या रखडलेल्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून प्रभाग रचना करण्याचे आदेश नुकतेच निर्गमित झालेले आहेत. यामध्ये नक्की प्रभाग रचना कशी करायची याबाबत आदेशामध्ये स्पष्ट उल्लेख आहे; त्याचा थोडक्यात घेतलेला आढावा…

नगरपरिषद, नगरपंचायती सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रभात पद्धतीने नुसार प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश 2025

महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 च्या कलम 10 च्या पोट कलम १ मधील तरतुदीनुसार निवडणुकी करता प्रभाग रचना शासनाने राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने करावयाची असून शासन नगरपरिषद, नगरपंचायतीच्या बाबतीतले हे शासनाचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी यांना प्रदान करीत आहे. संबंधित जिल्हाधिकारी आपले अधिकार त्यांच्या अधिपत्याखालील अधिकाऱ्यांना प्रत्यार्पित करणार नाहीत.

या निवडणुकांचे कामकाज पार पाडताना लोकसभा व विधानसभा निवडणुकांप्रमाणे सर्व काळजी व दक्षता घेणे आवश्यक आहे. ही जबाबदारी पार पाडताना निवडणुकांचे पावित्र्य राखणे आणि निवडणूक प्रक्रिया मुक्त न्याय व पारदर्शक रीतीने पार पडेल, हे संबंधित जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांनी पाहणे अत्यंत आवश्यक आहे.

जनगणना कार्यालयाने प्रसिद्ध केलेली लगतच्या जनगणनेनुसार नगरपरिषद, नगरपंचायती क्षेत्राची प्रगणक एकूण लोकसंख्या अनुसूचित जातीची व अनुसूचित जमातीची लोकसंख्या प्रगणक नकाशे घर यादी, जनगणना कार्यालयाकडून उपलब्ध करून घ्यावी. प्रभाग रचना ही फक्त लगतच्या जनगणनेच्या लोकसंख्येच्या आधारे केली जाते, म्हणून त्या क्षेत्रातील मतदार संख्या अथवा सध्याची रहिवाशांची संख्या विचारात घेता येत नाही व याचा प्रभाग रचनेशी कसलाही संबंध येत नाही.

विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक नगरपालिका प्रशासन यांनी सदस्य संख्या निश्चित करणे, महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 च्या कलम 9 (2) मधील तरतुदीनुसार नगरपरिषद नगरपंचायतीची सदस्य संख्या शासनाने निश्चित केलेल्या दिनांक पूर्वी निश्चित करावी.

नगरपरिषद क्षेत्रातील जनगणनेतील लोकसंख्येच्या आधारावर परिशिष्ट 1 नुसार एकूण सदस्य संख्येची संख्या करण्यात यावी. यानुसार रचना करताना महाराष्ट्र अधिनियम क्र. 12 दि. 25 जानेवारी 2022 नुसार नगर परिषदेची सदस्य संख्या विचारात घ्यावी.

महाराष्ट्र अधिनियम क्र. 12 दि. 25 जानेवारी 2022 नुसार फलटण नगरपरिषदेसाठी सदस्य संख्या अर्थात नगरसेवक संख्या ही 27 ठेवण्यात आली होती.

सन 2022 चा महाराष्ट्र अधिनियम क्र. 10 दि. 25 जानेवारी 2022 नुसार नगर परिषदेच्या प्रत्येक प्रभागातून निवडून द्यायची सदस्यांची तरतूद विचारात घ्यावी. त्यानुसार नगर परिषदेस प्रभाग आणि यज्ञ होतात. प्रभागांची संख्या परिशिष्ट 1 नुसार काढावी.

यामध्ये प्रभागांची संख्या ठरवताना शक्यतोवर सर्व प्रभाग दोन सदस्यांचे करावयाचे आहेत.

सर्वच प्रभाग 2 सदस्यांचे होत नसल्यास एक प्रभाग 3 सदस्यांचा होईल. असा 3 सदस्यांचा प्रभाव कोणत्या क्षेत्रात राहतील. हे भौगोलिक सलगता राखण्याच्या दृष्टीने प्रभाग रचना करताना नागरिकांची गैरसोय टाळता येईल अशा ठिकाणी ठेवण्यात यावा. याकरिता प्रत्यक्ष प्रभाग रचना करण्याबाबतचे इतर निकष देखील विचारात घ्यावेत. मात्र अशी कोणतीही परिस्थिती नसल्यास शेवटचा प्रभाग 3 सदस्यांचा राहील.

प्रभाग रचना करताना नगरपरिषदेची एकूण लोकसंख्या भागिले नगर परिषदेची एकूण सदस्य संख्या गुणिले संबंधित प्रभागातून निवडून द्यायच्या सदस्यांची संख्या या सूत्रानुसार एका प्रभागात समाविष्ट करावयाची सरासरी लोकसंख्या निश्चित करावी प्रभागाची लोकसंख्या त्या प्रभागाच्या सरासरी लोकसंख्येच्या 10% कमी किंवा दहा टक्के जास्त या मर्यादेत ठेवता येईल. एखाद्या अपवादात्मक परिस्थितीत प्रभागाची लोकसंख्या या किमान किंवा कमाल मर्यादेपेक्षा कमी किंवा जास्त असल्यास त्याचे कारण प्रभाग रचनेच्या प्रस्तावात नमूद करणे आवश्यक राहील.

प्रभाग रचना करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे

  1. प्रभाग रचना सुरू करताना सर्वप्रथम उत्तर दिशेकडून सुरुवात करावी. उत्तरेकडून ईशान्य त्यानंतर पूर्व दिशेकडे येऊन पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रभाग रचना करत सरकावे व शेवट दक्षिणेत करावा प्रभागांना क्रमांकही त्याच पद्धतीने द्यावेत प्रभाग रचना करताना भौगोलिक सरकता राखील याची काळजी घ्यावी.
  2. प्रभागाच्या सीमारेषा मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, डोंगर, रस्ते, रेल्वे, रूळ, फ्लाय ओव्हर इत्यादी नैसर्गिक मर्यादा विचारात घेऊन निश्चित करावी. कोणत्याही परिस्थितीत एका इमारतीचे चाळीचे घराचे विभाजन दोन प्रभागांमध्ये होणार नाही, याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे मोकळ्या जागांसह सर्व जागा कोणत्या ना कोणत्या प्रभागात आल्याच पाहिजेत. प्रभाग रचनेच्या बाबतीत कोणासही संख्या घेण्यास वाव राहणार नाही. याची दक्षता घेण्यात यावी सीमेचे वर्णन करताना रस्ते, रेल्वे, नाले, नद्या, सिटीसर्वे नंबर याचा उल्लेख प्रामुख्याने यावयास हवे.
  3. प्रभाग रचना करताना लोकसंख्या व प्रभागाची भौगोलिक दृष्ट्या आटोपशीर व्याप्ती या दोन मुख्य गोष्टी असल्या तरी नागरिकांच्या सामायिक हिताकरता खालील बाबी विचारात घ्याव्यात.
  4. प्रभागातील वस्त्यांचे शक्यतोवर विभाजन होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
  5. अनुसूचित जाती अथवा अनुसूचित जमाती यांच्या व त्यांचे शक्यतोवर विभाजन होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
  6. नागरिकांचे प्रभागामधील दळणवळण शक्यतो विचारात घ्यावे.
  7. प्राथमिक आरोग्य सुविधा केंद्र, दवाखाने, स्मशानभूमी, बाजार हाताच्या जागा, पाणीपुरवठ्याच्या तसेच जलनिसरण्याच्या सोयी सुविधा इत्यादींचा वापर नागरिकांकडून करण्यात येतो. त्या नागरिकांचा समावेश असलेल्या प्रभागातच शक्यतोवर त्या सोयी सुविधा ठेवण्यात याव्यात.
  8. प्रभागातील मुलांकरता सर्वसाधारण उपलब्ध असणाऱ्या प्राथमिक शाळा मैदानी इत्यादी शक्यतोवर त्याच प्रभागात ठेवण्यात याव्यात.
  9. नगर परिषदेची प्रभाग रचना करताना त्याची मांडणी गुगल अर्थ चा नकाशावर करणे अनिवार्य आहे.
  10. मागील अनेक निवडणुकांमध्ये निदर्शनास आल्यानुसार अयोग्य प्रकारे प्रभाग रचना केली गेल्यामुळे अनेक रिट याचिका माननीय उच्च न्यायालयात दाखल झाले आहेत. काही याचिकांमध्ये अशा चुकीच्या प्रभाग रचनेबाबत न्यायालयाने आदेश दिलेले आहेत यामुळे तयार केलेल्या प्रभाग रचनेचा आराखडा योग्य प्रकारे तयार करण्यात आला असून नियम व निकषांचे पालन झाले आहे, याची दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधित मुख्याधिकारी आहे.
  11. सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याकरता मुख्याधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नमूद अधिकाऱ्यांची समिती तयार करण्यात यावी. यामध्ये संबंधित नगरपरिषद क्षेत्राची संपूर्ण माहिती असलेला अधिकारी, प्रभाग रचनेशी संबंधित नेमलेला अधिकारी, नगरचनाकार, संगणक तज्ञ व आवश्यकतेनुसार इतर अधिकारी.

Back to top button
Don`t copy text!