फलटण नगरपालिकेकडून विमानतळाची स्वच्छता; “स्थैर्य” इफेक्ट


दैनिक स्थैर्य । 8 जून 2025। फलटण । फलटण विमानतळावर दररोज व्यायाम करण्यासाठी शेकडो नागरिक येत असतात, यासोबतच येणाऱ्या काही दिवसांमध्ये फलटणच्या विमानतळावरच पालखी सोहळा विराजमान होणार आहे.

तरीसुद्धा फलटण विमानतळाची नियमित स्वच्छता करण्यात येत नसल्यामुळे विमानतळावर मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे साम्राज्य झालेले होते. दैनिक स्थैर्यच्या माध्यमातून आवाज उठवल्यानंतर फलटण नगरपालिकेने तातडीने विमानतळाची स्वच्छता केली आहे.

येणाऱ्या काळामध्ये सुद्धा फलटण विमानतळाची नियमित स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.


Back to top button
Don`t copy text!