फलटण पालिका निवडणूक: प्रभागनिहाय राजकीय चित्र; ‘राजे गट’ विरुद्ध ‘खासदार गट’ संभाव्य दावेदार निश्चित


स्थैर्य, फलटण, दि. 7 नोव्हेंबर : फलटण नगरपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर आता सर्वच प्रभागांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. ‘राजे गट’ आणि ‘खासदार गट’ या दोन्ही प्रमुख आघाड्यांनी संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. आरक्षण, प्रभागातील प्रमुख भाग आणि दोन्ही गटांकडील प्रबळ दावेदार कोण आहेत, याचे सविस्तर राजकीय चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे.

सध्या चर्चेत असलेली बहुतांश नावे ही त्या-त्या कुटुंबातील राजकीय प्रमुखांची आहेत. अनेक प्रभागांमध्ये महिला आरक्षण असल्याने, अंतिम तिकीट हे संबंधित कुटुंबातील सदस्याला (उदा. पत्नी, सून, बहीण) मिळण्याची दाट शक्यता आहे, तरीही सध्या राजकीय वर्तुळात या प्रमुखांच्या नावांचीच चर्चा आहे.

एकूण १३ प्रभागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत प्रभागनिहाय स्थिती, आरक्षण आणि संभाव्य उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत:

प्रभाग क्रमांक १

  • नगरसेवक: २
  • आरक्षण: अनुसूचित जाती (महिला), सर्वसाधारण
  • प्रमुख भाग: नगर परिषद पाणीपुरवठा केंद्र, फिरंगाई मंदिर, सोमवार पेठ, श्रीराम साखर कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती.
  • संभाव्य लढत: राजे गटाकडून सोमशेठ जाधव, विक्रम जाधव, मंगेश आवळे तर खासदार गटाकडून देविदास पाटील व संजय गायकवाड यांची नावे चर्चेत आहेत.

प्रभाग क्रमांक २

  • नगरसेवक: २
  • आरक्षण: अनुसूचित जाती (महिला), सर्वसाधारण
  • प्रमुख भाग: मंगळवार पेठ परिसर, बस स्थानक समोरील परिसर, पुणे रस्ता परिसर.
  • संभाव्य लढत: राजे गटाकडून सनी अहिवळे व हरीश काकडे, तर खासदार गटाकडून सचिन अहिवळे आणि सौ. वैशाली सुधीर अहिवळे, प्रशांत (अप्पा) काकडे हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

प्रभाग क्रमांक ३

  • नगरसेवक: २
  • आरक्षण: अनुसूचित जाती, सर्वसाधारण (महिला)
  • प्रमुख भाग: आखरी रस्ता पूर्व बाजू, उर्दू शाळा, कुरेशी मस्जिद, बुरूड गल्ली, खाटिक गल्ली, परिट गल्ली.
  • संभाव्य लढत: राजे गटाकडून शक्ती भोसले, सागर सोरटे, जॉनी पलंगे, आशय अहिवळे तर खासदार गटाकडून ऋषिराज नाईक निंबाळकर, दीपक सरगर, घनश्याम सरगर किंवा अमोल भोईटे यांच्या नावांची चर्चा आहे.

प्रभाग क्रमांक ४

  • नगरसेवक: २
  • आरक्षण: नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) (महिला), सर्वसाधारण
  • प्रमुख भाग: आखरी रस्ता पश्चिम बाजू, पठाणवाडा, पाचबत्ती चौक, शनी मंदिर, जैन मंदिर, दगडी पूल परिसर.
  • संभाव्य लढत: या प्रभावात दोन्हीकडे इच्छुकांची संख्या जास्त आहे. राजे गटाकडून ॲड. अशोक जाधव, नितीन भोसले, अनिल जाधव, पप्पू शेख, किशोरसिंह नाईक निंबाळकर, किशोर देशपांडे, सत्यजीत घोरपडे, सौ. सिध्दी पवार, सौ. सारिका पवार, सौ. प्रभा हेंद्रे, जालिंदर जाधव, सुरेश निंबाळकर, रामभाऊ पवार, भाऊसाहेब कापसे तर खासदार गटाकडून वसीम मणेर, अण्णा घाडगे, विठ्ठल आंबोले, कांताशेठ नाईक हे दावेदार आहेत.

प्रभाग क्रमांक ५

  • नगरसेवक: २
  • आरक्षण: अनुसूचित जाती (महिला), सर्वसाधारण
  • प्रमुख भाग: श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालय, जिंती नाका, गोसावी वस्ती, इंदिरानगर वसाहत.
  • संभाव्य लढत: राजे गटाकडून पांडुरंग गुंजवटे व संग्राम अहिवळे, तर खासदार गटाकडून समशेरसिंह नाईक निंबाळकर (जर नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिले नाहीत तर), दत्तराज व्हटकर व संग्राम सावंत यांची नावे चर्चेत आहेत.

प्रभाग क्रमांक ६

  • नगरसेवक: २
  • आरक्षण: नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC), सर्वसाधारण (महिला)
  • प्रमुख भाग: संतोषी माता मंदिर परिसर, सगुनामाता नगर, निमकर सीड्स, बॅ. राजाभाऊ भोसले घर परिसर.
  • संभाव्य लढत: राजे गटाकडून दीपक कुंभार, सुरेश पवार, शुभम थोरात, तर खासदार गटाकडून सौ. विजया अशोकराव जाधव प्रबळ दावेदार आहेत.

प्रभाग क्रमांक ७

  • नगरसेवक: २
  • आरक्षण: सर्वसाधारण (महिला), सर्वसाधारण
  • प्रमुख भाग: संत बापुदास नगर, हनुमान नगर, सातारा रस्ता, मुधोजी कॉलेज परिसर, जुने ग्रामीण पोलीस स्टेशन परिसर.
  • संभाव्य लढत: हा प्रभाग ‘हाय-व्होल्टेज’ लढतीमुळे चर्चेत आहे. राजे गटाकडून पांडुरंग गुंजवटे, दादा कर्णे, तर खासदार गटाकडून अनुप शहा, बाळासाहेब कुंभार, विशाल राहीगुडे, अमोल लवळे, राजेंद्र निंबाळकर किंवा घनवट यांच्या नावाची शक्यता आहे.

प्रभाग क्रमांक ८

  • नगरसेवक: २
  • आरक्षण: नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC), सर्वसाधारण (महिला)
  • प्रमुख भाग: ब्राह्मण गल्ली, शंकर मार्केट परिसर, मारवाड पेठ परिसर, श्रीराम मंदिर, मुधोजी प्राथमिक शाळा.
  • संभाव्य लढत: राजे गटाकडे दादासाहेब चोरमले, विशाल तेली, नितीन भोसले, अमरसिंह खानविलकर, अमरसिंह (बापू) देशमुख , सनी शिंदे असे अनेक इच्छुक आहेत. खासदार गटाकडून सिद्धाली अनुप शहा, सनी मांढरे, फिरोज आतार, अजय माळवे व विकास कर्वे यांची नावे आघाडीवर आहेत.

प्रभाग क्रमांक ९

  • नगरसेवक: २
  • आरक्षण: नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) (महिला), सर्वसाधारण
  • प्रमुख भाग: गजानन चौक, नगर परिषद परिसर, उमाजी नाईक चौक, मटन मार्केट, रविवार पेठ तालीम परिसर.
  • संभाव्य लढत: राजे गटाकडून गीतेश गावडे, रामभाऊ मदने, नाना पवार, मोहन पोतेकर तर खासदार गटाकडून युवराज पवार, ऋषिराज नाईक निंबाळकर, मेहबूब मेटकरी, राजू शिरतोडे, अमोल भोईटे हे दावेदार आहेत.

प्रभाग क्रमांक १०

  • नगरसेवक: २
  • आरक्षण: नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) (महिला), सर्वसाधारण
  • प्रमुख भाग: बसस्थानक, घडसोली मैदान, शिवाजीनगर, पृथ्वी चौक (अहिल्यादेवी चौक), खर्डेकर विद्यालय परिसर.
  • संभाव्य लढत: राजे गटाकडून श्रीमंत रघुनाथराजे, मिलिंद नेवसे, सौ. ज्योत्स्ना अनिल शिरतोडे, गणेश शिरतोडे, विशाल पवार, ॲड. राजेंद्र झोरे इच्छुक आहेत. खासदार गटाकडून बबलू मोमीन, अमीर शेख, अमित भोईटे, मनीषा राजेंद्र काळे यांची नावे चर्चेत आहेत.

प्रभाग क्रमांक ११

  • नगरसेवक: २
  • आरक्षण: नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC), सर्वसाधारण (महिला)
  • प्रमुख भाग: मुधोजी हायस्कूल परिसर, प्रशासकीय इमारत परिसर, डी.एड. चौक, बंटीराजे खर्डेकर घर परिसर.
  • संभाव्य लढत: राजे गटाकडे दादासाहेब चोरमले, मिलिंद नेवसे, किशोर तारळकर, युवराज निकम, भरत बेडके असे अनेक इच्छुक आहेत. खासदार गटाकडून संदीप चोरमले, रणजितसिंह भोसले, राहुल निंबाळकर, अमीर शेख, सचिन शिंदे (वकील) हे प्रबळ दावेदार आहेत.

प्रभाग क्रमांक १२

  • नगरसेवक: २
  • आरक्षण: अनुसूचित जाती, सर्वसाधारण (महिला)
  • प्रमुख भाग: स्वामी विवेकानंद नगर, दत्तनगर, हणमंतराव पवार हायस्कूल परिसर, कामगार कॉलनी.
  • संभाव्य लढत: राजे गटाकडून विकास काकडे, सिकंदर डांगे, सुभाष मठपती, सुनील मठपती, प्रीतसिंह खानविलकर, उमेश काकडे तर खासदार गटाकडून अरुण खरात, डॉ. प्रवीण आगवणे व सागर शहा यांची नावे चर्चेत आहेत.

प्रभाग क्रमांक १३

  • नगरसेवक: ३
  • आरक्षण: नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) (महिला), सर्वसाधारण (महिला), सर्वसाधारण
  • प्रमुख भाग: भडकमकर नगर, पोलिस स्टेशन कॉलनी, इरिगेशन कॉलनी, गोळीबार मैदान, विद्यानगर, लक्ष्मीनगर.
  • संभाव्य लढत: हा एकमेव तीन नगरसेवकांचा प्रभाग आहे. राजे गटाकडून श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, सौ. दीपाली शैलेश निंबाळकर, श्रीमती रंजना जगन्नाथ कुंभार, श्रीमंत रघुनाथराजे, श्रीमंत सत्यजितराजे, प्रकाश पवार (नाना) हे प्रमुख दावेदार आहेत. खासदार गटाकडून सौ. मनीषाताई नाईक निंबाळकर, सौ. ज्योती सचिन बेडके, ऋतुराज भोईटे, राहुल निंबाळकर, अमोल सस्ते, सौ. कदम यांची नावे आघाडीवर आहेत.

एकंदर, सर्वच प्रभागांमध्ये ‘राजे गट’ विरुद्ध ‘खासदार गट’ अशी थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही गटांकडून अद्याप अधिकृत उमेदवार याद्या जाहीर झाल्या नसल्या तरी, या संभाव्य दावेदारांच्या नावांनी शहरातील राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे.


Back to top button
Don`t copy text!