
स्थैर्य, फलटण, दि. १५ सप्टेंबर : फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांची पुणे येथे बदली झाली असून, त्यांच्या जागी सांगली येथे कार्यरत असलेले निखिल जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या काही महिने आधीच हा प्रशासकीय बदल झाल्याने या बदलीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
निखिल मोरे यांनी आपल्या कार्यकाळात फलटण शहरात विविध विकासकामे आणि प्रशासकीय सुधारणा राबवल्या होत्या. आता त्यांची बदली पुणे येथे झाली आहे.
त्यांच्या जागी येणारे नवनियुक्त मुख्याधिकारी निखिल जाधव हे सध्या सांगली येथे कार्यरत आहेत. त्यांच्यासमोर आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या कामकाजासह शहरातील विकासकामांचे मोठे आव्हान असणार आहे. या प्रशासकीय बदलामुळे नगरपरिषदेच्या कामकाजावर काय परिणाम होतो, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.