फलटण नगरपरिषद अध्यक्षपद सर्वसाधारण खुले; राजकीय घडामोडींना वेग, दिग्गज रिंगणात उतरण्याची शक्यता

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, फलटण, दि. ६ ऑक्टोबर : मुंबईतील मंत्रालयात आज झालेल्या आरक्षण सोडतीत फलटण नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पद ‘सर्वसाधारण खुला’ प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. अध्यक्षपद खुले झाल्याने आता ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि हायप्रोफाईल होण्याची शक्यता असून, राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

अध्यक्षपद सर्वसाधारण खुले झाल्याने अनेक दिग्गज नेते आता रिंगणात उतरण्यास इच्छुक असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने राजे गटाकडून युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांचे नाव आघाडीवर आहे, तर भाजपा व महायुतीकडून समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि दिलीपसिंह भोसले यांची नावे चर्चेत आहेत. हा प्रवर्ग खुला असल्याने कोणत्याही प्रबळ महिला उमेदवारालाही संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राज्यातील चित्र

आजच्या सोडतीमध्ये राज्यातील २२६ नगरपरिषदा व नगरपंचायतींचे अध्यक्षपदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले. यामध्ये अनुसूचित जाती महिला, इतर मागासवर्गीय (ओबीसी), आणि सर्वसाधारण महिलांसाठी अनेक प्रमुख परिषदा आरक्षित झाल्या आहेत. एकूण जागांपैकी ५० टक्के जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. या आरक्षण सोडतीमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!