
फलटण ते कुरवली बुद्रुक दत्तनगर ही नवीन बससेवा माजी जि.प. सदस्य जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत सुरू झाली. विद्यार्थिनींच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले.
स्थैर्य, फलटण, दि. 13 जानेवारी : फलटण ते कुरवली बुद्रुक दत्तनगर या मार्गावरील नवीन बससेवेचा शुभारंभ सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या बससेवेचा शुभारंभ विद्यार्थिनींच्याच हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला असून, यावेळी जिजामाला नाईक निंबाळकर यांनी विद्यार्थिनींसोबत बस प्रवासही केला.
ग्रामीण भागातील विद्यार्थिनी व नागरिकांच्या दळणवळणाच्या सोयीसाठी फलटण–कुरवली बुद्रुक दत्तनगर ही नवीन बससेवा सुरू करण्यात आली. या सेवेच्या प्रारंभामुळे शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनींना मोठा दिलासा मिळाला आहे.

उद्घाटनानंतर जिजामाला नाईक निंबाळकर यांनी स्वतः विद्यार्थिनींसोबत बसमध्ये प्रवास करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. सुरक्षित व नियमित बससेवा उपलब्ध झाल्याने शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या विद्यार्थिनींना याचा थेट फायदा होणार आहे.
या बससेवेच्या सुरूवातीमुळे कुरवली बुद्रुक दत्तनगर परिसरातील ग्रामस्थांना फलटणशी थेट संपर्क साधणे सुलभ होणार आहे. विशेषतः विद्यार्थिनी, कामगार व ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे.

