फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघ गावांतर्गत मूलभूत सुविधांसाठी २० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध : आ. दीपक चव्हाण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १४ सप्टेंबर २०२३ | फलटण | ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे (लेखाशीर्ष २५१५, १२३८) योजनेंतर्गत फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघातील विविध कामांसाठी विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व आमदार दीपकराव चव्हाण यांनी केलेल्या मागणीनुसार आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मागण्यांसाठी १० कोटी आणि आ. दीपकराव चव्हाण यांच्या मागण्यांसाठी १० कोटी, असे एकूण २० कोटी रुपये दि. ५ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी उपलब्ध करून दिले आहेत.

उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्यासमवेत शासनाला पाठिंबा देताना आपल्या मतदारसंघातील किंबहुना सातारा जिल्ह्यातील विविध विकासकामांना खीळ बसू नये आणि सुरू असलेला विकास अखंडित सुरू रहावा, ही भावना होती. त्याप्रमाणे आतापर्यंत तालुक्यात सुमारे २०० कोटी रूपये विविध कामांसाठी उपलब्ध झाले असून आगामी काळात गरजेनुसार आणखी निधी निश्चित उपलब्ध होईल, याची ग्वाही आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.

या निर्णयानुसार ग्रामीण भागातील रस्त्यांचे विशेषतः अंतर्गत रस्त्यांसह मुख्य रस्त्यांना गावे, वस्त्या जोडणार्‍या रस्त्यांचा, रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण, काँक्रीटीकरण यासह सभामंडप, सामाजिक सभागृह, स्मशानभूमी, दहावा शेड, ग्रामपंचायत कार्यालय आणि ग्रामसचिवालय उभारणी, ग्रामपंचायत कार्यालय परिसर सुशोभीकरण, किचन शेड वगैरे विविध कामांचा यामध्ये समावेश आहे.

आ. दिपकराव चव्हाण यांनी मागणी केलेली विकासकामे व त्यासाठी मंजूर निधी खालीलप्रमाणे –

१) आसु येथे अंतर्गत रस्ता करणे ९ लाख रुपये, २) गुणवरे बरड रस्ता – कॅनॉल पुल – बागेवाडी – कॅनॉल पुल रस्ता करणे १२ लाख रुपये, ३) मठाचीवाडी अंतर्गत रस्ता करणे १० लाख रुपये, ४) पवारवाडी अंतर्गत रस्ता करणे १८ लाख रुपये, ५) निंबळक ते शिंदेवस्ती २१ फाटा रस्ता करणे १५ लाख रुपये, ६) आसु ते पवारटेक रस्ता ग्रामा १३१ रस्ता सुधारणा करणे १० लाख रुपये, ७) निंबळक कापसेवस्ती अंतर्गत रस्ता करणे १५ लाख रुपये, ८) तावडी रस्ता ते ठाकुरकी फलटण नगर पालिका हद्दीपर्यंत रस्ता करणे १० लाख रुपये, ९) खुंटे येथे फलटण खुंटे रस्ता ते धुमाळवस्ती रस्ता करणे १० लाख रुपये, १०) हणमंतवाडी येथे लक्ष्मीआई मंदिर सामाजिक सभागृह बांधणे १० लाख रुपये, ११) सरडे येथे सरडे राजाळे रस्ता ते भिमराव शेंडगे वस्ती रस्ता करणे १० लाख रुपये, १२) तावडी येथे होलेवस्ती ते कैकाडी मळा रस्ता करणे १२ लाख रुपये,१३) साठे येथे गावडेवस्ती ते जाधववस्ती रस्ता करणे १२ लाख रुपये, १४) कांबळेश्वर येथे पिंपळमळा लकडेवस्ती ते वाघवस्ती रस्ता करणे १२ लाख रुपये, १५) कोळकी येथे किरण बोळे घर ते काकडे बिल्डींग रस्ता करणे ८लाख रुपये, १६) चव्हाणवाडी येथे चौंडी ओढा ते चव्हाणवाडी रस्ता करणे १५ लाख रुपये, १७) आदर्की खु॥ येथे आबासाहेब निंबाळकर घर ते संजय रामचंद्र निंबाळकर यांचे घरापर्यंत रस्ता करणे १० लाख रुपये, १८) फरांदवाडी ग्रामपंचायत कार्यालय परिसर सुधारणा करणे १० लाख रुपये, १९) फलटण काळुबाईमंदिर ते बामणकी ओढा फरांदवाडी रस्ता ग्रामा २४१ रस्ता सुधारणा करणे २५ लाख रुपये, २०) निरगुडी येथे महादेव मंदिर ते निरगुडी हायस्कुल रस्ता करणे १० लाख रुपये, २१) निरगुडी येथे महादेव मंदिरा जवळील स्मशानभुमी दहावा विधीसाठी घाट बांधणे ७ लाख रुपये, २२) जिंती येथे साखरवाडी रणवरे वस्ती ते सुरेशराव गरुड घर रस्ता करणे १२ लाख रुपये, २३) मौजे खुंटे येथे मारुती मंदिर ते खंडोबा मंदिर रस्ता करणे ८ लाख रुपये, २४) मौजे सस्तेवाडी होलारवस्ती ते गरुडवस्ती रस्ता करणे १५ लाख रुपये,२५) मौजे चौधरवाडी येथे जोतिबा मंदिर (विलास कदम दुकान) ते फलटण सर्कल (मुजुमलेवस्ती) रस्ता करणे १० लाख रुपये, २६) मौजे शिंदेवाडी अंतर्गत फलटण जिंती रस्ता ते बर्गेवस्ती पाटणेवाडी बंदिस्त गटर करणे १० लाख रुपये, २७) मौजे साखरवाडी येथे फुलेनगर ते काळुबाईमंदिर रस्ता करणे २० लाख रुपये, २८) मौजे होळ डंकीनवस्ती रस्ता ते होळ साखरवाडी जोड रस्ता करणे १० लाख रुपये, २९) प्रजिमा १० ते चिमणीशाळा मार्ग सस्तेवाडी रस्ता ग्रामा ५९ रस्ता सुधारणा करणे २० लाख रुपये, ३०) सोमंथळी येथे उद्धव शिपकुले वस्ती ते जगतापवस्ती रस्ता करणे १२ लाख रुपये, ३१) सोमंथळी येथे स्टॅन्ड ते मारुती मंदिर रस्ता करणे २० लाख रुपये, ३२) सोमंथळी येथे मारुती मंदिर येथे किचन शेड बांधणे १० लाख रुपये, ३३) विडणी येथे सावतामाळी मळा ते कोल्हेवस्ती रस्ता करणे १० लाख रुपये, ३४) विडणी गांवठाण ते आण्णा कोंडी नाळे वस्ती रस्ता करणे ९ लाख रुपये, ३५) मौजे धुळदेव येथे आसु रस्ता २३ फाटा ते कर्णेवस्ती गटर करणे ७ लाख रुपये, ३६) मौजे पिंप्रद अंतर्गत रस्ता करणे १० लाख रुपये, ३७) राजाळे २६ फाटा ते रामराजेनगर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे १० लाख रुपये, ३८) सरडे बंगला ते कांतीलाल बेलदार रस्ता खडीकरण करणे १८ लाख रुपये, ३९) मौजे कोळकी शारदानगर फलटण शिंगणापुर रोड ते नक्षत्र अपार्टमेंट रस्ता करणे १० लाख रुपये, ४०) मौजे दुधेबावी गाव अंतर्गत रस्ते करणे १० लाख रुपये, ४१) झिरपवाडी येथे पेरुचा मळा येथे ओढ्यावर लहान पुलाचे बांधकाम करणे ५ लाख रुपये, ४२) सोनवडी खु॥ ग्रामपंचायत ते शिंदेवस्ती रस्ता करणे १० लाख रुपये, ४३) मौजे तिरकवाडी येथे पाची मळा रस्ता करणे ८ लाख रुपये, ४४) मुंजवडी ३४ मायनर फाटा रस्ता करणे १० लाख रुपये, ४५) मौजे बरड येथे लंगुटेवस्ती जाधववस्ती रस्ता करणे १० लाख रुपये, ४६) राजुरी येथे पंढरपुर रोड लिफ्ट ते साळुंखेवस्ती रस्ता करणे १० लाख रुपये, ४७) मौजे कुरवली बु॥ पाटीलवस्ती येथे रस्ता करणे १० लाख रुपये, ४८) मौजे आंदरुड येथे अंतर्गत रस्ता करणे १० लाख रुपये, ४९) मौजे वाजेगाव निंबळक येथे अंतर्गत रस्ता करणे १५ लाख रुपये, ५०) तरडगाव ते सालपे रस्ता करणे १५ लाख रुपये, ५१) तरडगाव येथे पुणे पंढरपुर रस्ता ते वरचामळा रस्ता करणे १० लाख रुपये, ५२) मौजे तरडगाव येथे गुळदगडवस्ती ते कोरडेवस्ती रस्ता करणे १० लाख रुपये, ५३) रावडी खु॥ येथे होळकरवस्ती रस्ता ते कॅनॉल रस्ता करणे १० लाख रुपये, ५४) तडवळे गावठाण अंतर्गत रस्ता करणे १० लाख रुपये, ५५) कुसुर गावठाण ते धुमाळवस्ती रस्ता करणे १० लाख रुपये, ५६) आरडगाव गाव अंतर्गत रस्ता कॉक्रिटीकरण करणे १० लाख रुपये, ५७) मौजे माळेवाडी स्मशानभुमीकडे जाणारा रस्ता करणे १० लाख रुपये, ५८) कोरेगांव ते लोणंद रस्ता ग्रामा ९ रस्ता सुधारणा करणे १० लाख रुपये, ५९) हिंगणगाव भैरवनाथ मंदिरा समोरील चौक व रस्ता कॉक्रीटीकरण करणे १० लाख रुपये, ६०) टाकोबाईचीवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी सभामंडप बांधणे १० लाख रुपये, ६१) आळजापुर गावठाण अंतर्गत कॉक्रीट रस्ता करणे १० लाख रुपये, ६२) आदर्की बु॥ स्टॅन्ड ते भैरवनाथ मंदिर पेव्हर ब्लॉक टाकणे ८ लाख रुपये, ६३) सालपे येथे भैरवनाथ मंदिराशेजारी सभामंडप बांधणे १० लाख रुपये, ६४) सासवड येथे तांबखडा वस्ती रस्त्यावर पुल बांधणे १० लाख रुपये, ढवळेवाडी (निं) येथे सभामंडप बांधणे १० लाख रुपये, ६५) मलवडी कारंडेवस्ती प्रा. शाळा रस्ता खडीकरण करणे ७ लाख रुपये, ६६) वाघोशी अंतर्गत रस्ता करणे ८ लाख रुपये, ६७) घाडगेवाडी येळेवस्ती रस्ता करणे ८ लाख रुपये, ६८) नांदल गावठाण अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालयासमोर कॉक्रिटीकरण करणे ८ लाख रुपये, ६९) घाडगेमळा येथे पवारमळा रस्ता करणे ८ लाख रुपये, ७०) गिरवी दुधेबावी वडले रस्त्याजवळील भवानी मंदिर लगतचा रस्ता करणे १० लाख रुपये, ७१) मौजे गिरवी निलेश कदम घर ते हिर मणेर (पोलिसपाटील) घर ते बोडकेवाडी रस्ता करणे ९ लाख रुपये, ७२) मौजे फरांदवाडी निंबाळकरवस्ती ते वडजल रस्ता करणे व मोरी बांधकाम करणे १० लाख रुपये, ७३) मौजे जाधववाडी (फ) बिरदेवनगर येथे अंतर्गत रस्ता करणे १० लाख रुपये, ७४) मौजे वाठार निंबाळकर फलटण सातारा रोड चिंध्यादेवी मंदिर ते मोरे वस्ती रस्ता करणे १० लाख रुपये, ७५) मौजे वाठार निंबाळकर मरिमाता मंदिर ते जालिंदर जाधव घर रस्ता करणे १० लाख रुपये, ७६) मौजे उपळवे मरिमातामंदिर सभामंडप बांधणे ७ लाख रुपये, ७७) मौजे जाधवनगर येथे फलटण उपळवे रस्ता ते गोरेवस्ती रस्ता करणे ८ लाख रुपये, ७८) तरडफ प्रा. आरोग्य उपकेंद्र ते पांडववस्ती रस्ता करणे १० लाख रुपये, ७९) मौजे जोर (वाखरी) येथे स्मशानभुमी बांधणे ८ लाख रुपये, ८०) खडकी ते सुळवस्ती रस्ता करणे ९ लाख रुपये.

कोरेगाव तालुका

८१) कोरेगाव तालुका मौजे मोरबेंद येथे अंतर्गत रस्ता करणे ८ लाख रुपये, ८२) मौजे आसणगाव येथे अंतर्गत रस्ता करणे ७ लाख रुपये, ८३) मौजे भावेनगर स्मशानभुमी बांधणे ८ लाख रुपये, ८४) मौजे पिंपोडे बु॥ येथे सोनके रोड ते महाजन किराणा स्टोअर रस्ता कॉक्रीटीकरण करणे ८ लाख रुपये, ८५) नांदवळ येथे श्री सदाशिव पवार तात्या यांचे घर ते विठ्ठल काकी पवार यांच्या घरापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करणे ५ लाख रुपये, ८६) मौजे चौधरवाडी साकव पुल बांधणे ७ लाख रुपये, ८७) मौजे पिंपोडे बु॥ येथे गार्डीवस्ती ते शिंदेवस्ती रस्ता कॉक्रीटीकरण करणे ८ लाख रुपये, ८८) मौजे नायगाव येथे ग्रामपंचायत समोर रस्ताकॉक्रिटीकरण करणे ८ लाख रुपये, ८९) मौजे वाठार स्टेशन येथे आशीर्वाद हॉस्पिटल ते मोबाईल टावर पर्यंत रस्ता मुरमीकरण खडीकरण डांबरीकरण काँक्रिटीकरण करणे ८ लाख रुपये, ९०) मौजे विखळे महादेव मंदिर सभा मंडप बांधणे १० लाख रुपये, ९१) मौजे फडतरवाडी येथे प्रल्हाद गायकवाड संपत फडतरे यांचे घरापासुन अंगणवाडीकडे जा्णारा सिमेंट रस्ता करणे ८ लाख रुपये, ९२) मौजे सोळशी येथे ग्रामपंचात कार्यालय बांधणे १५ लाख रुपये, ९३) मौजे विखळे येथे स्मशानभुमी संरक्षक भिंत व बैठक व्यवस्था करणे ८ लाख रुपये, ९४) मौजे वाघोली येथे गावठाण ते गुणाई रस्ता करणे १० लाख रुपये, ९५) मौजे तळीये येथे अंतर्गत रस्ता करणे १० लाख रुपये.


Back to top button
Don`t copy text!