
स्थैर्य, फलटण, दि. २५ नोव्हेंबर : नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर हे सुसंस्कृत आणि विकासाला गती देणारे नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वात फलटण अधिक सुरक्षित राहील, असा विश्वास राजे गटाचे युवा कार्यकर्ते शक्ती भोसले यांनी व्यक्त केला आहे. ते प्रभाग क्रमांक ३ मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ बोलत होते.
प्रभाग क्रमांक ३ मध्ये शिवसेनेच्या चिन्हावर उभ्या असलेल्या पूनम सुनील भोसले आणि सुषमा हेमंत ननावरे यांच्यासाठी शक्ती भोसले यांनी मतदारांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
त्यांनी मतदारांना विनंती केली की, नगराध्यक्षपदासाठी श्रीमंत अनिकेतराजे यांना तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली शहरात उभ्या असलेल्या शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे.
श्रीमंत अनिकेतराजे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग ३ चा विकास होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

