फलटण | माजी खासदार रणजितसिंह यांच्यावतीने उद्या मोफत सायकल वाटप


दैनिक स्थैर्य | दि. 17 जुलै 2024 | फलटण | माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून गरजु विद्यार्थी व विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप करण्यात येणार आहे; अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी दिली.

यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की; माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून फलटण शहर व तालुक्यातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम हा उद्या दि. 18 जुलै रोजी सकाळी 10 वाजता सजाई मंगल कार्यालय येथे संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रमास फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले, पोलीस उपअधीक्षक राहुल धस, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.


Back to top button
Don`t copy text!