स्थैर्य, फलटण, दि. १० : अभियांत्रिकी महाविद्यालय आपण फलटणला सुरू करून अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फ़त अद्यावत सुविधा देण्याचा संस्थेचा नियमित प्रयत्न असतो. अभियांत्रिकी महाविद्यालय फलटण येथे सुरू केल्यानंतर कमिन्स कंपनीचे अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी चांगले सहकार्य लाभलेले आहे. महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले व त्याची यशस्वी वाटचाल आपण सुरु ठेवली आहे. आता करोनाच्या काळात आपल्याला शिक्षण पध्दतीत काय बदल करून कोणत्या प्रकारे आपल्याला शिक्षण देता येतील त्या बद्दल आपण आता कार्यरत राहणार असून अभियांत्रिकी महाविद्यालयात नवीन प्राचार्य आपण नेमलेले आहेत. महाविद्यालयाचे नूतन प्राचार्य डॉ. अजय देशमुख यांना अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्य करण्याचा प्रदीर्घ असा अनुभव असून फलटणचे अभियांत्रिकी महाविद्यालय आता करोनाच्या काळात सर्व नवीन आवाहने पेलण्यास सज्ज असून आता विद्यार्थ्यांना कश्या प्रकारे शिक्षण देता येईल त्याचे हि नियोजन महाविद्यालयाने केले आहे, अशी माहिती फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव व महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे अध्यक्ष्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
फलटण येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाबाबत माहिती देण्यासाठी महाविद्यालयात पत्रकार परिषद आयोजित केलेली होती. या वेळी भोजराज नाईक निंबाळकर, हेमंत रानडे, शिरीष दोशी, डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य, प्रशासकीय अधिकारी निकम सर, अधीक्षक फडतरे व महाविद्यालयाचे नूतन प्राचार्य डॉ. अजय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्योगक्षेत्र व शैक्षणिक क्षेत्र त्यातल्या त्यात अभियांत्रिकीच्या शिक्षणात योग्य ते बदल करण्यात सर्वच प्रयत्नशील आहेत. हे नेमके कुठले बदल अभियांत्रिकी शिक्षणासाठी पूरक आहेत या बद्दल आता उत्सुकता दिसून येत आहे. या निमित्याने शैक्षणिक उपक्रमाचा आढावा घेऊन वेगळे प्रयत्न होणे अत्यावश्यक आहे. आपल्या फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकताच प्राचार्य म्हणून मी रुजू झालेलो आहे. संशोधनाचा आय आय टी पवई मधील अनुभव तसेच उद्योग क्षेत्रात केलेले उपक्रम आणि त्यातून अभियांत्रिकीच्या शिक्षणात आणलेल्या व येऊ घातलेल्या उपक्रमाबाबत इंडस्ट्री रेडीनेस ऑफ इंजिनियर्स, सेन्टर ऑफ एक्सलन्स, इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ऑटोमेशनच्या मदतीने चर्चासत्र, अभियांत्रिकीच्या गणितावरील चर्चासत्र, अभ्यासक्रम, त्यातील मूल्यवर्धक घटक आणि विद्यार्थ्यांचे शिक्षण व स्क्ल्सि मधील सुधारणा व विकास ऑटोमेशन, रोबोटिक्स अशा विशेष तंत्रज्ञानाची भर आणि प्रशिक्षण तसेच स्मार्टसिटी, इंडस्ट्री ४.० प्रशिक्षण, ऍग्रीकल्चर ४.०, स्मार्टहेल्थ केअर आणि स्मार्ट इनर्जी या विषयाला धरून अभ्यासक्रमाची गुणवत्ता वाढेल, उद्योग क्षेत्रासाठी विद्यार्थ्यास विशेष मार्गदर्शन भारतातील संशोधन संस्था तसेच इन्स्टिटयूट ऑफ हायर लर्निग येथील तज्ञांचे मार्गदर्शन आपल्या फलटण येथील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. प्रैक्टिकल एक्सपोजर व प्रशिक्षण (उद्योगक्षेत्रातील गरजेनुसार व विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार) पायाभूत व आधुनिक गरजांचे तंत्रज्ञान तसेच नवीन शिक्षण प्रणालीनुसार क्रॉस डिसीप्लिनरी, मल्टि डिसिप्लिनरी व ट्रान्स डिसिप्लिनरी विषयाचे संयुक्त व समन्वयाने, सहकार्याने आकलन, सायन्स, टेकनॉलॉजि, इंजिनीरिंग व मॅथेमॅटिक्स् यातील पूर्वतयारी व उद्योगजनक निर्मितीसाठी पूर्तता फॅकल्टी डेव्हलपमेंट व एक्सपोजर प्रोग्राम (या मागच्या २ महिन्याच्या काळात १००० च्या वर इंजि. फॅकल्टीचे बेसिक ट्रेनिग डॉ. अजय देशमुख यांनी घेतले आहे) पुढील ऍडव्हान्स ट्रेनिंगसाठी नियोजन फलटण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने घेतले जाईल, अशी माहिती अभियांत्रिकी महाविद्यालयाचे नूतन प्राचार्य डॉ. अजय देशमुख यांनी दिली.
या वेळी अधिक माहिती देताना देशमुख म्हणाले कि, उद्योग क्षेत्रासाठी (MoU) कंपन्यांकडून इच्छुक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यासाच्या सोई इंटर्नशिप व प्लेसमेंट विद्यार्थ्याच्या एक्सलन्स साठी शिक्षकांकडून प्रामाणिक व योग्य ने प्रयत्न केले जातील. ज्यामुळे त्यांची सर्वांगीण उन्नती होईल. जिज्ञासु बानू वाटेल संशोधनात्मकता व उद्योजकता वाढेल महाविद्यालयात अभ्यास संशोधनात्मक वातावरण होण्यासाठी प्रयत्न, पब्लिक एज्युकेशन वर भर देण्यासाठी – रामण इफेक्ट ‘ व भौतिकशास्त्र व अभियांत्रिकी या विषयातील महत्वाचे टप्पे याविषयी मार्गदर्शन याची लिंक Youtube वर उपलब्ध असून याचा सर्वानी लाभ घ्यावा. प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी व्हॅल्यू अॅडिशन ट्रेंनिग घेत असल्यामुळे जागतिक दर्जाचे व इंडस्ट्रीला उपयुक्त असलेल्या विषयाचे मार्गदर्शन आणि सोप्या भाषेत समजेल अशा पद्धतीचे शिक्षण आता आपल्या फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये उपलब्ध झाले आहे. महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचे शिक्षण महावियालयात उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न होणार असून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या सर्वतोपरी मार्गदर्शनाखाली व मदतीमुळेच हे सर्व शक्य होणार आहे.
सदर आयोजित पत्रकार परिषदेचे आभार भोजराज नाईक निंबाळकर यांनी मानले.