भाजपा अल्पसंख्याक सेलच्या प्रदेश सरचिटणीस पदी फलटणचे नगरसेवक अनुप शहा यांची निवड; भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांची माहिती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. ०२ : फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक अनुप शहा यांच्या कार्याची भारतीय जनता पार्टीने दखल घेवून त्यांची भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी निवड करण्यात आलेली आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक अनुप शहा हे गेले काही वर्ष कार्यरत आहेत. भारतीय जनता पार्टीमध्ये दाखल झाल्यापासून नगरसेवक अनुप शहा यांनी भाजपासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष इजाज देशमुख यांनी शहा यांची निवड जाहीर केलेली आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी दिली.

नगरसेवक अनुप शहा यांची निवड झाल्याबद्दल खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटण नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, नगरसेवक अशोकराव जाधव, नगरसेवक सचिन अहिवळे, युवा नेते अभिजीत नाईक निंबाळकर, दिशा कमिटी सदस्य डॉ. प्रविण आगवणे, भटक्या विमुक्त जमाती सेलचे अध्यक्ष सुनील जाधव, महिला मोर्चाच्या अध्यक्षा उषा राऊत व इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!