‘नशामुक्त भारत’ अभियानासाठी फलटण शहर पोलिसांची सायकल रॅली

सायकल ग्रुप आणि पोलिसांचा जनजागृतीसाठी संयुक्त उपक्रम; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


स्थैर्य, फलटण, दि. १७ ऑगस्ट : ‘नशामुक्त भारत’ अभियानाच्या अनुषंगाने, आज सकाळी फलटण शहर पोलीस ठाणे आणि शहरातील सायकल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. नशेमुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जागृती करणारे फलक घेऊन या रॅलीत सायकलस्वार आणि पोलीस मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या निर्देशानुसार, जिल्ह्यात दि. १३ ते १७ ऑगस्ट या कालावधीत ‘नशामुक्त भारत’ अभियान राबवण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून, आज सकाळी ७ वाजता फलटण शहर पोलीस ठाण्यातून या रॅलीस सुरुवात झाली. पाचबत्ती चौक, नाना पाटील चौक मार्गे ही रॅली पुन्हा पोलीस ठाण्यात समाप्त झाली.

या रॅलीमध्ये सायकलस्वार तुकाराम कोकाटे, डॉ. राजगोपाल खंडेलवाल, राम मुळीक, मेजर अर्जुन नाळे, गणपतराव बनसोडे, रवी शिंदे यांच्यासह ४० ते ४५ सायकलस्वार सहभागी झाले होते. पोलीस दलातर्फे पोलीस उपनिरीक्षक अंकुश इवरे, सहाय्यक पोलीस फौजदार संतोष कदम, पोलीस हवालदार राजेंद्र घाडगे, अमोल रनवरे, पोलीस अंमलदार सीताराम बगले, भाग्यश्री बहिरट, सुरज परिहार आणि पांडुरंग धायगुडे यांनी सहभाग घेतला.

या संपूर्ण रॅलीचे नियोजन आणि सहभाग पोलीस अंमलदार स्वप्नील खराडे यांनी यशस्वीरीत्या पार पाडले.


Back to top button
Don`t copy text!