हरवलेले मोबाईल शोधण्यात फलटण शहर पोलिसांना यश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ३० मार्च २०२४ | फलटण |
फलटण शहर पोलीस ठाण्याने हरविलेले किंवा चोरीस गेलेल्या मोबाईल फोनबाबत नजीकच्या पोलीस ठाण्यात तात्काळ माहिती द्यावी, असे आवाहन फलटण शहर पोलीस ठाण्याने केले होते. त्या पार्श्वभूमीवर हरविलेल्या मोबाईल फोनबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यास प्राप्त झालेल्या घटनांपैकी श्री. फिरोज इब्राहिम शेख (रा. लक्ष्मीनगर, फलटण), श्री. जय लालासोा बोराटे (रा. बोराटवाडी, ता. माण) व श्री. बाबुराव जगन्नाथ ढमाळ (रा. मालोजीराजेनगर, कोळकी, फलटण) यांचे मोबाईल फलटण शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने शोध घेऊन ते वरील संबंधितांना सुपूर्द केले आहेत.

ही कामगिरी जिल्हा पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस ठाण्याचे पो.ह. चंद्रकांत धापते, पो.शि. स्वप्निल खराडे, अतुल बडे, सचिन पाटोळे, संभाजी जगताप यांच्यासह फलटण शहर पोलीस ठाण्याकडील अधिकारी व अंमलदारांनी केली.

यापुढेही हरविलेल्या आणि चोरीस गेलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्यात येत असून असे अनेक मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.


Back to top button
Don`t copy text!