फलटण शहर पोलीसांनी केली कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या 16 जनावरांची सुटका; 6 जणांविरोधात गुन्हा दाखल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण दि.२४ : फलटण शहरातील कुरेशी नगर येथे शहर पोलीसांनी छापा टाकून कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या 16 जनावरांची सुटका केली. कारवाईदरम्यान घटनास्थळावरुन 7 लाख 44 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सहा जणांविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या बाबत फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, सोमवार दि. 22 रोजी रात्री 8:30 च्या सुमारास फलटण शहरातील कुरेशी नगर येथे पोलीसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांना गो वंशीय जातीच्या जनावरांची कत्तल करुन शेजारच्या वाडग्यात कत्तलीसाठी डांबून ठेवलेली जनावरे मिळून आली. या प्रकरणी जमील कुरेशी, शाहरुख कुरेशी, मुबारक हनिफ कुरेशी, अजीम शरीफ कुरेशी, इरफान याकुब कुरेशी सर्व रा. कुरेशी नगर फलटण या पाचजणांसह कत्तलीसाठी पाणी पुरवठा केलेल्या शहरातील अज्ञात टँकर मालकाविरोधात गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन 70 हजार रुपये किंमतीचे 700 किलो गोवंशीय जातीचे मांस, 1 लाख 74 हजार रुपये किंमतीची सोळा गोवंशीय जातीची जनावरे, 5 लाख रुपये किंमतीचा पाण्याचा टँकर व 200 रुपये किंमतीचे लोखंडी पाते असा एकुण 7 लाख 44 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी संबंधित आरोपींविरुध्द महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम व प्राणी छळ अधिनियमाद्वारे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या बाबतची फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल अतुल बडे यांनी दिली असून तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!