दैनिक स्थैर्य | दि. ७ सप्टेंबर २०२४ | फलटण |
फलटण एसटी बसस्थानकात हारतालिका व गणेश आगमननिमित्ताने तोबा गर्दी झालेली आहे.
गणेशोत्सवासाठी नोकरदारांची आपापल्या गावी जाण्यासाठी धावपळ उडाल्याचे दिसत आहे. तसेच उत्सवातील लागणार्या साहित्याची खरेदी करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात फलटणला येत आहेत. त्यामुळे व्यापार्यांनीही आपली दुकाने साहित्याने पूर्ण भरली आहेत. खरेदीसाठी नागरिकांची फलटण बाजारपेठेत गर्दी दिसत आहे.