फलटण: ब्लूम इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची अबॅकस–वेदिक मॅथ्समध्ये घवघवीत भरारी


फलटण येथील ब्लूम इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय अबॅकस व वेदिक मॅथ्स स्पर्धेत चॅम्पियन व विनर गटात २४ पारितोषिके पटकावून शाळेचा नावलौकिक वाढवला.

स्थैर्य, फलटण, दि. २१ जानेवारी : ईश्वर कृपा शिक्षण संस्था संचलित ब्लूम इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, गुणवरे येथील विद्यार्थ्यांनी उत्कर्ष क्रिएशन, पुणे आयोजित राष्ट्रीय अबॅकस व वेदिक मॅथ्स स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी चॅम्पियन ऑफ चॅम्पियन, चॅम्पियन, विनर–१ आणि विनर–२ या गटांत एकूण २४ पारितोषिके पटकावली.

पुणे येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत ग्रामीण भागातील शाळाही गुणवत्तेत मागे नसल्याचे ब्लूम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सिद्ध केले. वेगवान गणिती कौशल्य, अचूकता आणि सातत्य याच्या जोरावर विद्यार्थ्यांनी विविध गटांत यश मिळवले.

चॅम्पियन ऑफ चॅम्पियन : निलश्री बरमा शेडगे

वरद शिवाजी नाळे, श्रावणी तानाजी कदम, सिद्धी पांडुरंग सुडके, मुस्कान सिकंदर डांगे, अनुष्का शरद भंडलकर, सावी धीरज गौंड, विरेन विशाल पवार, अमरसिंह आबासाहेब कोळेकर.

वरद वैभव माळशिकारे, तेजराज अनिल रणदिवे, अनया प्रकाश शिंदे, काव्यांजली तात्याबा शेंडगे, भक्ती कैलास शिंदे, अनुष्का गजानन कर्णे, सिद्धी सुरेश भोईटे, सर्वेश जयदीप यादव, आदित्य सागर भंडलकर.

सरिषा सुजित जगताप, समृद्धी दिनेश टेंबरे, शिवम दत्तात्रेय बिचुकले, शौर्य संजय जाधव, दिव्यांका धीरज दोशी, विधी मनोजकुमार खुसपे.

या सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षिका सौ. सोनाली गौंड यांचे मार्गदर्शन लाभले. ईश्वर कृपा शिक्षण संस्थेने गुणवत्ता वाढीच्या उपक्रमांना नेहमीच पाठबळ दिले असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या अबॅकस व वेदिक मॅथ्स परीक्षांसाठीही सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ईश्वर तात्या गावडे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी संभाजी गावडे, संस्थेच्या सचिव साधना गावडे, शाळेचे प्राचार्य गिरीधर गावडे, शिक्षक–शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Back to top button
Don`t copy text!