
थेट WhatsApp वर मिळवा
दिवाळीनिमित्त फलटण शहरातील लक्ष्मीनगर येथील बारवबाग परिसरात श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळातर्फे आकर्षक किल्ला साकारण्यात आला असून, नागरिकांनी या किल्ल्याला भेट देण्याचे आवाहन नगरसेविका सिद्धाली शहा यांनी केले आहे.
स्थैर्य, फलटण, दि. १२ नोव्हेंबर : दिवाळीच्या उत्साहात फलटण शहरातील लक्ष्मीनगर परिसरातील बारवबाग येथे श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने एक आकर्षक किल्ला साकारण्यात आला आहे. या किल्ल्याची पाहणी करण्यासाठी नगरसेविका सिद्धाली शहा आणि माजी नगरसेवक अनुप शहा यांनी मंडळाला सदिच्छा भेट दिली.
किल्ल्याची पाहणी व उपस्थितांची माहिती
यावेळी मंडळाच्यावतीने साकारण्यात आलेल्या कलाकुसरीची पाहणी करत मान्यवरांनी शिवकालीन संस्कृतीच्या संवर्धनासाठी तरुणांनी घेतलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. या प्रसंगी राजवीर माने, ओंकार जाधव, अभय जाधव, विशाल ठोंबरे, यश जाधव, अब्बास शेख, अरबाज शेख, श्रीराज ओवाळे, तन्मय काळे, राहुल माने, सत्यजीत देसाई, अक्षय देसले, वैभव साळुंखे, शिवम अब्दागिरे, शरयू माने, अनिता ठोंबरे, राधा ठोंबरे, आरुष गायकवाड यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. फलटणकर नागरिकांनी या किल्ल्याला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन यादरम्यान करण्यात आले.





