फलटण | मुलींना मोफत सायकलसाठी कोणत्याही शाळेने मागणी करा; शाळा कोणाचीही असो सायकली देणार : माजी खासदार रणजितसिंह


दैनिक स्थैर्य | दि. 19 जुलै 2024 | फलटण | फलटण तालुक्यामधील प्रत्येक शाळेमध्ये शिकणाऱ्या सर्व मुलींना मोफत सायकलचे वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये कोणाचीही, कोणतीही शाळा असो त्यांना मोफत सायकल देण्यात येणार आहे. शाळेच्या प्राचार्यांनी याबाबत रीतसर मागणी करावी; मागणी केल्यावर त्यांना काही दिवसातच मोफत सायकल वितरण करण्यात येणार आहे; अशी माहिती माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

काल फलटण येथे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून मोफत सायकल वितरण करण्यात आले. त्यानंतर अनेकांनी मोफत सायकलची मागणी सुरू केली आहे.

ज्या विद्यार्थ्यांना सायकल हवी आहे; त्यांनी रीतसर मागणी त्यांच्या शाळेमध्ये प्राचार्यांच्याकडे करावी. प्राचार्यांनी आलेल्या सर्व मागण्या एकत्र करत आमच्याकडे मागणी करावी. पुढील टप्प्यामध्ये त्यांना सायकल वितरण करण्यात येईल. माजी खासदार रणजितसिंह यांच्या माध्यमातून फलटण तालुक्यातील प्रत्येक विद्यार्थिनींना मोफत सायकल वितरण करण्यात येणार आहे. एकूण 15 हजार मोफत सायकल वितरण फलटण तालुक्यात करण्यात येणार आहेत; अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी यावेळी दिली.


Back to top button
Don`t copy text!