
स्थैर्य, फलटण, दि. ४ नोव्हेंबर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात रविवार, दि. २ नोव्हेंबर रोजी झालेल्या लिलावात मुगाला प्रतिक्विंटल ८००० रुपयांपर्यंतचा भाव मिळाला. त्याखालोखाल घेवड्याला ६२०० रुपये तर हरभऱ्याला ५६५० रुपये भाव मिळाला. बाजारात मका (१०१८ क्विंटल) आणि बाजरी (७६३ क्विंटल) यांची आवक मोठ्या प्रमाणात झाली.
इतर धान्यांचे घाऊक बाजारभाव (कंसात आवक – क्विंटल) पुढीलप्रमाणे:
- ज्वारी : २५०० ते ४००० (२००)
- बाजरी : २४०० ते ३२०० (७६३)
- गहू : २५०० ते ३०३० (४४५)
- हरभरा : ५००० ते ५६५० (४१)
- मका : १५०० ते १८०० (१०१८)
- खपली : ४४०० ते ४७०० (१०)
- घेवडा : ५००० ते ६२०० (२८८)
- मुग : ६००० ते ८००० (१०)
- उडीद : ४५०० ते ५२५१ (८२)

