पेट्रोलचा ‘भडका’! जाणून घ्या आज ‘पेट्रोल-डिझेल’ किती महागले


 

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.२८ – पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज शनिवारी पुन्हा वाढ झाली असून पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 24 पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 27 पैसे इतकी वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीतील पेट्रोलचा दर 82 रूपये 13 पैसे तर डिझेलचा दर 72 रूपये 13 पैसे इतका झाला आहे.

गेल्या 20 नोव्हेंबर पासून आज म्हणजे सलग आठव्या दिवशी या इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या आठ दिवसांत पेट्रोल एकूण 1 रूपया 7 पैशांनी तर डिझेल एकूण 1 रूपया 67 पैशांनी महागले आहे.

मधल्या बिहार निवडणुकीच्या काळात तेल कंपन्यांना पेट्रोल डिझेलचे भाव बदलण्यास अनुमती नाकारण्यात आली होती. त्यांना आता पुन्हा ती अनुमती देण्यात आल्याने दररोजचे भाव या कंपन्यां जाहीर करीत आहेत त्यानुसार ही भाववाढ करण्यात येत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!