स्थैर्य, फलटण, दि. ११: सध्या फलटण, माण व खटाव तालुक्यामध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेले आहेत. स्थानिक पातळीवर तातडीचे उपचार मिळण्यासाठी ऑक्सिजन कॉन्सट्रेटॉर हे उपकरण अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. म्हणूनच सातारा जिल्हा परिषदेने १५ व्या वित्त आयोगातून ऑक्सिजन कॉन्सट्रेटॉर खरेदी करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेली होती. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची मागणी मान्य केली असून सातारा जिल्हा परिषदने १५ व्या वित्त आयोगातून ऑक्सिजन कॉन्सट्रेटॉर मशीन खरेदी करण्याची परवानगी दिलेली आहे. त्या बाबत जिल्हा परिषदेने आदेश पारित केलेले आहेत.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने केलेली मागणी सातारा जिल्हापरिषदेने मान्य केलेली आहे. तरी सातारा जिल्हा परिषदेने १५ व्या वित्त आयोगातून ऑक्सिजन कॉन्सट्रेटॉर खरेदीची मान्यता दिलेली आहे. तरी आगामी काळामध्ये गटविकास अधिकारी यांच्यामार्फत प्रत्येक ग्रामपंचायतीने प्रस्ताव सादर करावेत व जास्तीत जास्त ऑक्सिजन कॉन्सट्रेटॉर मशीनची खरेदी करून कोरोना बाधित रुग्णांचे जीव वाचण्यामध्ये योगदान द्यावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी केलेले आहे.