जिल्ह्यातील सेतू, महा ई सेवा केंद्र आजपासून सुरू जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची परवानगी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


प्रतिबंधित क्षेत्रात मात्र परवानगी नाही

स्थैर्य, सोलापूर, दि.17 : जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळून सेतू, महा-ई-सेवा केंद्रे सामाजिक अंतर राखून तसेच कोरोना रोखण्याबाबतच्या सर्व उपाययोजनांच्या अंमलबजावणीस बांधील राहून सुरू करण्यास जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाचे अध्यक्ष मिलिंद शंभरकर यांनी परवानगी दिली आहे. मात्र गर्दी टाळण्यासाठी सेतू केंद्र, महा-ई-सेवा केंद्रामध्ये अपॉईंटमेंटशिवाय येण्याची नागरिकांना परवानगी दिली जाऊ नये, असे त्यांनी आदेशात नमूद केले आहे.

शासनाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये 13 मार्च 2020 पासून लागू करण्यात आलेला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याकरिता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. त्यासाठी लॉकडाऊन दिनांक 30 जून 2020 पर्यंत वाढविण्यात आला असून, विविध औद्योगिक व व्यावसायिक आस्थापना सुरू करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे.

सेतू व महा ई सेवा केंद्रामध्ये घ्यावयाची खबरदारी

1) सेतू, महा-ई-सेवा केंद्रातील सामग्री /बायोमेट्रीक उपकरणे व परिसराचे निर्जंतुकीकरण करून घेणे आवश्यक आहे.

2) सेतू, महा-ई-सेवा केंद्रातील चालक व इतर ऑपरेटर यांनी स्वच्छताविषयक सर्व निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे. (उदा. वारंवार साबणाने हात धुणे, सॅनिटायझर वापरणे इत्यादी)

3) सेतू, महा-ई-सेवा केंद्रामध्ये काम करताना ऑपरेटर नाक, तोंड, व डोळ्यांना स्पर्श होणार नाही, याची दक्षता घेतील.

4) सेतू, महा-ई-सेवा केंद्रातील ऑपरेटर व येणाऱ्या नागरिकांनी पूर्णवेळ तोंडाला मास्क वापरावा. केवळ फोटो काढण्याच्या वेळेस मास्क काढण्यास परवानगी देण्यात यावी.

5) सेतू, महा-ई-सेवा केंद्रात येणाऱ्या नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छतेचे पालन केले पाहिजे.

6) सेतू, महा-ई-सेवा केंद्र व्यवस्थापक टेबल/ ऑपरेटर स्थानकांदरम्यान शारीरिक अंतर (किमान 1 मीटर) सुनिश्चित करण्याचे आहे. जास्त गर्दी टाळण्यासाठी सेतू, महा-ई-सेवा केंद्रामध्ये अपॉईंटमेंटशिवाय येण्याची नागरिकांना परवानगी दिली जाऊ नये.

7) नागरिकांना सामाजिक अंतर निश्चित करण्यासाठी योग्य अंतरासह उपयुक्त असेल तेथे मोकळ्या हवेत बसण्यास प्रोत्साहित करावे.

8) सेतू, महा-ई-सेवा केंद्रात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे थर्मल स्कॅनिंग करावे व त्याची दैनंदिन नोंद ठेवावी.

9) नागरिकांना किंवा कर्मचाऱ्यांना खोकला, ताप व कफ, श्वासोच्छवासाच्या अडचणी इत्यादीसारखी लक्षणे   आढळल्यास त्यांनी सेतू, महा-ई सेवा केंद्रात न येण्याबाबत फलक लावावेत.

10) सेतू, महा-ई-सेवा केंद्र यांनी शासनाने निश्चित केलेले सेवाविषयक दराचे फलक दर्शनी भागात लावावेत.

11) सेतू, महा-ई-सेवा केंद्र ऑपरेटरनी कोव्हीड-१९ च्या हॉटस्पॉटला जाणे किंवा अशा भागातून प्रवास करण्यास सक्त मनाई राहील.

12) प्रतिबंधित क्षेत्र (Containment Zone) यामधील गावे व भागात सेतू, महा-ई-सेवा केंद्र चालू करण्यात येऊ नयेत.

13) जिल्ह्यामध्ये सेतू, महा-ई-सेवा केंद्रात शिबीरे घेऊ नयेत.

14) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून, जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!