दैनिक स्थैर्य । दि. २८ मार्च २०२३ । बारामती । बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्क अंतर्गत पेपरमिंट क्लोदिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मध्ये बारामती हाय टेक टेक्स्टाईल पार्क च्या अध्यक्षा सौ.सुनेत्रा पवार यांच्या प्रेरणेतून आणि संस्थेचे संचालक संतोष कटारिया यांच्या मार्गदर्शनाखाली महिला दिना निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
महिलांचे आरोग्य व त्यांनी घ्यावयाची काळजी व वयाच्या विविध टप्प्यावर होणारे आजार व त्यासाठी पथ्ये ,घरगुती उपचार आणि व्यायाम आणि नोकरी व आहार आदी विषयावर मानवबंध संस्थेच्या संस्थापिका सौ सुषमा चव्हाण यांनी व्याख्यान दिले व महिलांच्या आरोग्य विषयक शंकांना उत्तरे दिली .
राज्य कामगार विमा योजना (ई एस आय सी) चे अधिकारी कैलास रायगर यांनी कामगार विमा व त्याचे फायदे याबद्दल मार्गदर्शन केले
कंपनी अंतर्गत विविध योजना मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व योगदान देणाऱ्या महिला कर्मचाऱ्यां ना गौरवण्यात आले.
याप्रसंगी डॉ. अंजली खाडे, डॉ.निरुपमा शहा, जिनेन्द्र कुमार खाने, टेक्स्टाईल पार्क चे अधिकारी अनिल वाघ यांची विशेष उपस्थिती होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे व्यवस्थापक शरद शिंगाडे व टीम यांनी विशेष मेहनत घेतली.