स्थैर्य, कोरेगाव, दि. 19 (अविनाश कदम) : होमिओपॅथीचे महत्व आता जनतेला पटू लागले आहे त्यामुळे या पॅथीला जनतेनेच राजाश्रय मिळवून द्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ रविंद्र भोसले यांनी केले, ते कोरेगाव तालुक्यातील सर्व पञकार बंधुची प्रतिकार शक्ती वाढावी यासाठी आर्सेनिक अलबम 30 या होमोयोपॅथिक औषधे प्रदान करताना बोलत होते.
डॉ रविंद्र भोसले पुढे म्हणाले की, आजच्या कोरोना वायरस लढाईमध्ये प्रशासन आरोग्य अधिकारी पोलीस यंत्रणेबरोबरच प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे सर्व पत्रकार बंधु जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस काम करीत आहेत. याची जाण वरिष्ठ पत्रकार पदाधिकारी यांना आहे म्हणूनच सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे, शरद काटकर, विनोद कुलकर्णी, दीपक प्रभावळकर सह सर्व पदाधिकाऱ्यांनी कोरेगाव तालुक्यातील ग्रामिण भागातील पत्रकार दाम्पत्याचे आरोग्य सुरक्षित रहावे, त्यांची प्रतिकार शक्ती वाढावी यासाठी आर्सेनिक अलबम 30 या होमोयोपॅथिक औषधे उपलब्ध केली आहेत.वैद्यकीय क्षेञात तब्बल पंच्चेचाळीस वर्षे कार्यरत असून जिल्हा पञका संघटनेच्या पदाधिका-यामुळेच आज मला तालुक्यातील पञकार बंधू पर्यंत पोहोचता आल्याचे खरे समाधान मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरेगाव तालुक्यातील सर्व पत्रकार बंधु यांनी समाधान व्यक्त करून सातारा जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी व डॉ रविंद्र भोसले यांना धन्यवाद देत आहेत