जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढतायत लोकांनी सतर्क राहावे, सार्वजनिक ठिकाणी मास्क नसल्यास पोलीस कारवाई करणार – गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.१८: राज्यासह जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून खबदारी घेतली पाहिजे. यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता केली पाहिजे, असे आवाहन गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज कोरोना संसर्गाबाबत आढावा बैठक गृह राज्यमंत्री (ग्रामीण) श्री. देसाई यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.

रस्त्यावंर विना मास्क कोणी दिसल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचना करुन गृहराज्यमंत्री श्री. देसाई पुढे म्हणाले, कोरोनाचा संसर्गाचा रुग्ण आढळल्यास त्याच्या संपर्कातील कमीत कमी 20 जणांची कोरोना चाचणी करावी. तसेच जिल्ह्यात कोरोना चाचणीचे प्रमाण वाढवावे. भाजी विक्रेते, दुकानदार, रेस्टॉरंटवाले यांची कोरोना चाचणी करण्यावर भर द्यावा.

नगर परिषद व मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये मास्क, सुरक्षित अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता या विषयी जनजागृती करावी. सध्या 100 नागरिकांच्या उपस्थित लग्न समारंभ व इतर धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात येत आहे. परंतु लग्न समारंभात 500 ते 1000 नागरिक उपस्थित राहत असल्याचे निदर्शनास येत आहे. जेथे लग्न समारंभ होत आहे तेथे भेट देवून शासनाने व प्रशासनाने दिल्या सूचनांचे पालन होते काय हे पहावे. पालन होत नसल्यास कारवाई करण्यात यावी. तसेच पोलीस विभागाने पेट्रोलींगचे प्रमाण वाढविले पाहिजे, अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री श्री. देसाई यांनी शेवटी केल्या.


Back to top button
Don`t copy text!