दैनिक स्थैर्य । दि. १५ फेब्रुवारी २०२३ । मुंबई । भारताच्या देशी पेटीएम पेमेंट्स बँक लि. (पीपीबीएल) ने इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या डिजिधन मिशनद्वारे भरविल्या जाणाऱ्या डिजिटल पेमेंट्स उत्सवामध्ये श्रेष्ठ पुरस्कार प्राप्त केला आहे. यूपीआय व्यवहारांमध्ये सर्वात कमी सरासरी टेक्निकल डिक्लाइन दर राखण्यासाठी बँकेला हा पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार म्हणजे पेटीएम यूपीआयच्या मार्फत होणाऱ्या अतीवेगवान आणि सुरक्षित व्यवहारांची घेतली गेलेली दखल आहे. हा पुरस्कार रेल्वे मंत्रालय आणि संपर्क व इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान खात्याचे मंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यूपीआय व्यवहारांच्या यशस्वीतेच्या प्रमाणासंदर्भात पीपीबीएलने पुन्हा एकदा भारतातील सर्व प्रमुख बँकांपेक्षा सरस कामगिरी केली आहे. कंपनीच्या स्वत:च्या शक्तीशाली तंत्रज्ञान सुविधांमुळे कंपनीचे टेक्निकल डिक्लाइन रेट्स सर्वात कमी दरांपैकी एक आहेत.
यूपीआयमध्ये पी२एम (व्यक्तीकडून व्यापाऱ्यास होणारे पेमेंट) व्यवहारांच्या बाबतीत बँक आघाडीच्या स्थानावर असून या परिसंस्थेत ही सेवा वापरणाऱ्या मर्चंट पार्टनर्सपैकी सर्वाधिक पार्टनर्स पेटीएमचा वापर करतात. पेटीएम पेमेंट्स बँक ही सर्वात मोठी बेनिफिशिअरी बँक, अॅक्वायरिंग बँक आणि एक अग्रेसर रेमिटर बँक या नात्याने अद्यापही यूपीआय क्षेत्रातील सर्वात अग्रेसर कंपनी आहे.
पेटीएम पेमेंट्स बँक कोणत्याही थर्ड पार्टी अॅप प्रोव्हायडरशिवाय स्वत:हूनच यूपीआय व्यवहार पार पाडते. यातून होणाऱ्या मर्चंट पेमेंट्समुळे मिळणाऱ्या चालनेने भारतात डिजिटल पेमेंट्स होत आहेत व छोटी शहरे तसेच मोठ्या गावांमध्येही ही सुविधा वाढत्या प्रमाणात वापरल्या जात आहेत. बँकेच्या वेगवान पेमेंट्स आणि यशस्वीतेचा सर्वाधिक दर यांची हमी देणाऱ्या उच्च दर्जाच्या स्व-निर्मित तंत्रज्ञानामुळे यूपीआयद्वारे पैसे पाठविण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी ग्राहक व व्यापारी दोघेही पेटीएम पेमेट्स बँकेला वाढत्या प्रमाणात प्राधान्य देत आहेत.
पेटीएम पेमेंट्स बँक सातत्याने यूपीआय क्षेत्रातील अग्रेसर बँक राहिली आहे. एनपीसीएलद्वारे जारी करण्यात आलेल्या ताज्या अहवालानुसार एक बेनिफिशिअरी बँक म्हणून पीपीबीएलने जानेवारी २०२३ मध्ये १,७६५.८७ दशलक्ष व्यवहारांची नोंद केली आहे आणि रेमिटर बँक म्हणून ३८९.६१ दशलक्ष व्यवहारांची नोंद केली आहे.