एसएमई व मेक इन इंडिया ब्रँडवर अधिक भर
स्थैर्य, मुंबई, १३ : ऑफलाइन टू ऑनलाइन मॉडेलद्वारे भारतातील ई कॉमर्स क्षेत्राची व्याख्या बदलणा-या पेटीएम मॉलने फ्रीडम सेलच्या यशस्वी लाँचिंगची घोषणा केली आहे. १७ ऑगस्ट पर्यंत चालणा-या स्वातंत्र्य दिनाच्या सेलचा विशेष भर एसएमई आणि मेक इन इंडिया ब्रँडवर आहे. २०० पेक्षा जास्त एसएमई आणि स्टार्टअप्स २० वेगवेगळ्या प्रकारात ५०० पेक्षा जास्त नवी उत्पादने लाँच करत आहेत. किराणा दुकानांसह १०,००० पेक्षा जास्त ऑफलाइन दुकान मालकांनी या सेलमध्ये सहभाग नोंदवला असून ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करत आहेत.
कंपनीच्या मते मंचावरील विक्रेते आणि मोबाइल फोन, असॉर्टेड अॅक्सेसरीज, इलेक्ट्रॉनिक्स, होम आणि किचन, वर्क फ्रॉम होम आयटम्स, फॅशन, इलेक्ट्रॉनिक्स इत्यादीसह विविध प्रकारातील ब्रँडची अनेक उत्पादने १० ते ८० टक्के सवलतीत प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. तसेच ग्राहकांनी आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड, आयसीआयसीआय क्रेडिट कार्ड ईएमआय ट्रान्झॅक्शन आणि नेट बँकिंगचा वापर करून किमान ३००० रुपयांपुढे ऑर्डर खरेदी केल्यास ते १० टक्के अतिरिक्त कॅशबॅकसाठी पात्र ठरतील.
अनेक कॉटेज एम्पोरियम, कारागीर आणि महिला उद्योजक हाताने तयार केलेले दागिन्यांसह बनारसी आणि कांजीवरम साडी, हाताने शिवलेले कुर्ते, विविध राज्यांतील पारंपरिक पोशाख, घर आणि स्वयंपाकघर सजावटीचे साहित्य या प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी ठेवतील.
पेटीएम मॉलचे सीओओ अभिषेक राजन म्हणाले, “ या स्वातंत्र्यदिनी, आम्हाला मोठ्या प्रमाणावर एसएमई, कारागीर, भारतीय ब्रँड्सपर्यंत पोहोचायचे आहे. तसेच डिजिटल कॉमर्सचा भविष्यातील वितरण चॅनल म्हणून लाभ घेण्यासाठी त्यांना सक्षम करायचे आहे. कोव्हिडनंतरच्या जगात ऑनलाइन उत्पादने विकण्याची क्षमता असलेल्या विक्रेते आणि निर्मात्यांना व्यवसाय वृद्धी आणि विस्तारासाठी याची मदत होईल. आमच्या फ्रीडम सेलद्वारे सर्वोत्तम श्रेणीतील करार आणि अखंडित ई-कॉमर्स अनुभवासह ग्राहक खरेदीची भावना पुन्हा निर्माण केली जाईल, अशी आशा आहे. गेल्या काही महिन्यांत, आमच्या प्लॅटफॉर्मवर विक्रीत दुप्पट वाढ झाल्याचे अनुभवले. या सेलद्वारे विक्रीत वाढ होण्याची आशा आहे.”