दैनिक स्थैर्य । दि. ११ जुलै २०२२ । मुंबई । देशातील अग्रगण्य डिजिटल पेमेंट आणि वित्तीय सेवा कंपनी पेटीएमने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत वाढीचा वेग कायम ठेवला असून, ८.५ दशलक्ष कर्जे वितरित केली असून त्याचे एकूण मूल्य (जीएमव्ही) २.९६ लाख कोटी रुपये आहे. यातील वार्षिक वाढ १०१ टक्के आहे. कंपनीची सेवा घेणाऱ्या ग्राहकांमध्येही वाढ झाली असून, मासिक व्यवहारकर्त्यांची संख्या जून तिमाहीअखेर ७४.८ दशलक्ष झाली आहे. तर कंपनीचा वार्षिक कर्ज व्यवसाय आता २४,००० कोटी रुपयांहून अधिक झाला आहे.कंपनीने नुकतेच तिचे आर्थिक निकाल जाहीर केले. त्यात ही माहिती देण्यात आली आहे.
कंपनीचा वार्षिक कर्ज व्यवसाय आता २४,००० कोटी रुपयांहून अधिक असून जून अखेरच्या तिमाहीत ८.५ दशलक्ष रुपयांची कर्जे वितरित केली गेली आहेत. वार्षिक तुलनेत त्यात तब्बल ४९२ टक्के वाढ झाली आहे. या कर्जांचे एकूण मूल्य ५५५४ कोटी रुपये ( ७०३ दशलक्ष डॉलर)असून, त्यातील वार्षिक वाढ ७७९ टक्के आहे.
पेटीएमने ऑफलाइन पेमेंटमध्ये आपले आघाडीचे स्थान आणखी मजबूत केले आहे. जून २०२२पर्यंत ३.८ दशलक्ष पेक्षा अधिक उपकरणे उपलब्ध केली आहेत. कंपनीने सरासरी मासिक व्यवहार करणार्या वापरकर्त्यांच्या संख्येतही जून तिमाहीअखेर वार्षिक ४९ टक्के वाढ नोंदवली असून ही संख्या आता विक्रमी ७४.८ दशलक्ष इतकी आहे. केवळ जून महिन्यासाठी,ती ७५.९ दशलक्ष आहे. या तिमाहीसाठी एकूण व्यापारी मूल्य (जीएमव्ही) २.९६ लाख कोटी (३७ अब्ज डॉलर ) होते, यात वार्षिक १०१ टक्के वाढ दिसून आली आहे.
पेटीएमने मागील आर्थिक वर्षात महसुलात ८९ टक्के वाढ नोंदवत आर्थिक वर्ष २०२२ च्या चौथ्या तिमाहीत ५४१ कोटी रुपयांचा महसूल मिळवला होता. तर नफा वार्षिक २१० टक्क्यांनी वाढून ५३९ कोटी रुपये झाला. संपूर्ण आर्थिक वर्ष २२ साठी, कंपनीचा ऑपरेशन्समधील महसूल वार्षिक ७७ टक्क्यांनी वाढून ४,९७४ कोटी रुपये झाला, तर नफा वार्षिक ३१३ टक्के वाढून १, ४९८कोटी रुपये झाला.