प्रत्येक महिन्याला हप्ता द्या, नाही तर तुमची विकेट काढेन; चाकण एमआयडीसीतील प्रकार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, चाकण, पुणे, दि.१ : प्रत्येक महिन्याला हप्ता द्या, नाही तर तुमच्याकडे बघून घेईन, तुमची विकेट काढेल व जीवे ठार मारण्याची धमकी देत चाकण एमआयडीसीत खंडणी मागणाऱ्या पाच खंडणी बहाद्दरांना येथील पोलिसांनी सापळा रचून गुरुवारी (दि.२६) बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून खंडणीची वीस हजारांची रोकड व गुन्ह्यात वापरलेली बुलेट गाडी व एक चार चाकी वाहन जप्त करण्यात आले. चाकण एमआयडीसीतील कुरुळी (ता.खेड ) गावच्या हद्दीत २० ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबर २०२० या कालावधीत हा प्रकार सुरु होता. 

अजय शंकर कौदरे ( वय ३९, रा खरोशी, ता. खेड), प्रदीप रामचंद्र सोनवणे (वय ३२, रा खरोशी,), गणेश दशरथ सोनवणे ( वय ३३, रा. कुरूळी, ) स्वप्निल अजिनाथ पवार ( वय २९, रा. एकता नगर, चाकण.), धोंडीबा उर्फ हनुमंत विनायक वडजे ( वय ३२, रा मेदनकरवाडी, चाकण.) अशी अटक करण्यात आलेल्या खंडणी बहाद्दरांची नावे आहेत. त्यांच्याकडून वीस हजार रुपये व गुन्ह्यात वापरलेली एक बुलेट गाडी, एक चार चाकी वाहन जप्त करण्यात आले. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; चाकण एमआयडीसीतील कुरुळी गावच्या हद्दीत एक नामांकित कंपनी आहे. या कंपनीत माथाडी कामगार संघटनेचा अध्यक्ष अजय कौदरे व गणेश सोनवणे आणि त्यांचे वरील साथीदार वरील नियोजित कालावधीत संगनमताने कट रचून बेकायदेशीरपणे कंपनीत घुसत होते. कंपनी व्यवस्थापनाला कंपनी चालवायची असेल तर त्यांचे ” वेदांत एंटरप्राइजेस नावाचे माथाडी कामगार संघटनेचा एक कामगार कंपनीमध्ये नेमण्याचे दाखवून व प्रत्यक्ष कामावर न घेता त्याचे पगार असा एकूण प्रत्येक महिन्याला बावीस हजार रुपये हप्ता द्या. नाहीतर तुमच्याकडे बघून घेईल अशी जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागत होते.

कंपनीमध्ये संबंधित कंपनीमध्ये खंडणीची रक्कम घेण्यासाठी वरील बहाद्दर येणार असल्याचे तक्रारदार यांनी सांगितले. त्यानंतर पोलिस निरीक्षक अरविंद पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद शिरसागर यांनी तात्काळ या कंपनीमध्ये पोलिस स्टाफसह सापळा रचत खंडणी बहाद्दरांना जेरबंद करण्यात आले. 

ही कारवाई पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महाळुंगे इंगळे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद शिरसागर, पोलीस उपनिरीक्षक राहुल भदाने, पोलीस हवालदार राजेंद्र कोनेकरी, पोलीस नाईक संपत मुळे, प्रशांत वहिले , अमोल बोराटे, शहानवाज मुलानी, अजय गायकवाड, पवन वाजे यांनी केली.

” चाकण औद्योगिक परिसरात माथाडी स्क्रॅप व इतर कंपनीतील कामे मिळविण्यासाठी कोणी गैरमार्गाचा अथवा दादागिरीचा अवलंब करून औद्योगिक शांतता भंग करीत असल्यास कंपनी व्यवस्थापनाने निर्भीडपणे समोर येऊन पोलीस ठाण्यात रितसर तक्रार देणे अपेक्षित आहे.” – कृष्ण प्रकाश, पोलीस आयुक्त,.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!