
दैनिक स्थैर्य । दि. 20 जुन 2025 । फलटण । राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या फलटण तालुक्यामध्ये संपूर्ण ताकदीने लढवणार आहे. त्याबाबत येणाऱ्या काही दिवसांत राज्यातील व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा जाहीर मेळावा हा फलटणमध्ये संपन्न होणार आहे. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष संघटना हि फलटण तालुक्यात पुन्हा नव्याने बांधली जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ निकम यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस राजाभाऊ निकम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सदरील माहिती दिली.

फलटण तालुका हा शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारांना मानणारा तालुका आहे. यासोबतच शरदचंद्र पवार साहेबांचे सुद्धा फलटण तालुक्यात बारकाईने लक्ष आहे; त्यांचा फलटणबाबत विशेष जिव्हाळा आहे. येणाऱ्या काळामध्ये शरदचंद्र पवार यांच्या विचारांना मानणाऱ्या नागरिकांनी व इच्छुक पदाधिकाऱ्यांनी संघटनेत कामकाज करण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन सुद्धा प्रसिद्धीपत्रकात राजाभाऊ निकम यांनी केले आहे.