दैनिक स्थैर्य | दि. २७ जानेवारी २०२४ | फलटण |
फलटण तालुक्यातील सांगवी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषिकन्यांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२०२४ कार्यक्रमाअंतर्गत ‘सहभागी ग्रामीण मूल्यांकन’ हा कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पडला.
कृषीकन्या अनुजा भिसे, पूजा चौधरी, प्रणीता आगवणे, अंकिता कुंभारकर, भामे ऋतुजा, तनुजा शिंगाडे यांनी या कार्यक्रमाअंतर्गत सांगवी गावच्या नकाशाचा अभ्यास करून त्याची प्रतिकृती गावच्या ग्रामस्थांसमोर सादर केली. तसेच विविध सामाजिक नकाशे सादर करण्यात आले. त्याअंतर्गत लिंग गुणोत्तर नकाशा, गतिशीलता नकाशा, साक्षरता नकाशा, इत्यादी नकाशे दर्शवण्यात आले. वरील नमूद नकाशांची माहिती देखील ग्रामस्थांना सूचीद्वारे सविस्तररित्या दिली गेली. तसेच गावातील विविध हंगामातील पिके, ऐतिहासिक कार्यकारिणी सामाजिक नकाशाद्वारे सादर करून त्याची सविस्तर माहिती कृषीकन्यांकडून ग्रामस्थांना देण्यात आली.