दैनिक स्थैर्य | दि. २२ जानेवारी २०२४ | फलटण |
फलटण तालुक्यातील धुळदेव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषिकन्यांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२०२४ कार्यक्रमाअंतर्गत ‘सहभागी ग्रामीण मूल्यांकन’ हा कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पडला.
कृषीकन्या सिद्धी शेटे, साक्षी जाधव, समृद्धी जगताप, सिद्धिका कांबळे, स्वेजल पाटील, प्रियांका शिंदे, प्रियांका भोसले व श्वेता सस्ते यांनी या कार्यक्रमाअंतर्गत धुळदेव गावच्या नकाशाचा अभ्यास करून त्याची प्रतिकृती गावच्या ग्रामस्थांसमोर सादर केली. तसेच विविध सामाजिक नकाशे सादर करण्यात आले. त्याअंतर्गत लिंग गुणोत्तर नकाशा, गतिशीलता नकाशा साक्षरता नकाशा, उत्पादन नकाशा, माती नकाशा इत्यादी नकाशे दर्शवण्यात आले. वरील नमूद नकाशांची माहिती देखील ग्रामस्थांना सूचीद्वारे सविस्तररित्या दिली गेली. तसेच गावातील पाणी स्त्रोत, आर्थिक संस्था, विविध हंगामातील पिके, ऐतिहासिक कार्यकारिणी सामाजिक नकाशाद्वारे सादर करून त्याची सविस्तर माहिती कृषीकन्यांकडून ग्रामस्थांना देण्यात आली.
या कार्यक्रमाअंतर्गत ग्रामस्थ व कृषीकन्या यांच्यात गावच्या नकाशाबद्दलच्या माहितीची देवाघेवाण झाली. ग्रामस्थांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद दिला.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम समन्वय प्रा. नीलीमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे सर व प्रा. नितिशा पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.