
स्थैर्य, फलटण : येथील लायन्स क्लब ऑफ फलटण, लायनेस क्लब फलटण व वाठार निंबाळकर येथील आई प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने खास रक्षाबंधनानिमित्त भावा-बहिणीच्या अनोख्या नात्याबद्दल काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. तरी रक्षाबंधन बाबत जास्तीत जास्त कवींनी यामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश तांबे यांनी केलेले आहे.
याबाबत अधिक माहितीसाठी गणेश तांबे यांना 9890628720 या क्रमांकावर व्हाट्सअप द्वारे संपर्क साधावा व आपल्या स्वरचित कविता सदरील व्हाट्सअप नंबर वर रविवार दिनांक 2 ऑगस्ट 2020 रोजी अखेर पाठविण्यात याव्यात, असेही गणेश तांबे यांनी स्पष्ट केले आहे.