
स्थैर्य, सातारा, दि. 28 : गेल्या दोन आठवड्यांपासून परळी भागातील कोरोना बाधितांची संख्याही वाढतच जात असल्याने कराडच्या वनवासमाची नंतर परळी खोरे हे कोरोना बाधितांचे नवीन हॉटस्पॉट ठरत आहे. बुधवारी रात्री उशिरा मिळालेल्या अहवालानुसार येथील युवकाचा रिपोर्ट पॉझिटिव आल्याने गावात हडकंप उडाला होता.
सदर व्यक्ती ही ट्रॅव्हलिंग हिस्ट्री मधील असून मुंबईतून प्रवास करून आपल्या गावी आली होती. मुंबईहून येताना मिनीबस मधून जवळपास 12 जण एकत्र गावी परतले होते. वावदरे येथील सदर व्यक्ती 20 मे रोजी आपल्या गावात होम कॉरन्टीन असताना त्याला ताप थंडी जानवू लागली. संबंधित आरोग्य सेविका यांनी सतर्कता दाखवत सदर व्यक्तीस ठोसेघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले त्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मानसी पाटील यांना कोरोना सदृश्य लक्षणे दिसल्यानंतर सदर व्यक्तीस जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले तदनंतर बुधवारी रात्री त्या व्यक्तीचा रिपोर्ट बाधित असल्याचा समजताच भागात एकच खळबळ उडाली होती.
या व्यक्तीच्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील घरातील 3 जण अलवडी येथील 1 जण याना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. तसेच सहप्रवासी यांना होम कॉरन्टीन करून आरोग्य विभागाकडून लक्ष ठेवण्यात येणार आहे.