पालक ,शिक्षकांनी लहान मुलांच्या आरोग्याबरोबरच समतोल आहाराची काळजी घ्यावी – खटाव पंचायत समितीच्या सभापती सौ.जयश्री कदम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, औंध,दि २७: औंध येथे राष्ट्रीय पोषण पंधरवडया निमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.यावेळी माजी समाजकल्याण सभापती शिवाजीराव सर्वगोड, ग्रामपंचायत सदस्या शितल देशमुख, पर्यवेक्षिका पूजा गायकवाड,काजल कुंभार, प्रकाश कांबळे चारूशीला जाधव, लिना साळुंखे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी समाजकल्याण सभापती शिवाजीराव सर्वगोड म्हणाले की, सध्या कोरोनाचा कठिण काळ असून यामध्ये बालकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे ,संगोपन करणे ही प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे. त्यासाठी पालकांमध्ये याविषयी जनजागृती करणे गरजेचे आहे. एकात्मिक बालविकास प्रकल्पामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले व माहिती दिली. यावेळी शितल देशमुख, शुभांगी माळी,लिना साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत व सूत्रसंचालन चारूशीला जावव, अलका यादव यांनी केले आभार छाया भोकरे यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!