
दैनिक स्थैर्य | दि. ६ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण बसस्थानकावर फलटण लायन्स क्लबच्या माध्यमातून डॉ. करवा कुटुंबियांनी फार वर्षांपूर्वी उभारलेली पाण्याची टाकी हा येथे आगारात येणार्या प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी एकमेव आधार आहे. सध्या या पाण्याच्या टाकीची अवस्था दयनीय झाली आहे. या पाण्याच्या टाकीजवळ ठेवलेल्या वस्तू व पाण्याच्या टाकीची अवस्था बघून या पाणपोईची वापर होताना दिसत नाही.
ही पाण्याची टाकी व परिसर एकदा स्वच्छ करण्याची, टाकीची दुरूस्ती करून त्याचे कॉक नवीन बसविण्याची आवश्यकता आहे. या पाणपोईजवळील ठेवलेल्या इतर वस्तू हटवून या पाण्याचा वापर प्रवाशांना व्हावा, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. तसेच महामंडळाने अथवा एखाद्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून पिण्याच्या स्वच्छ, शुद्ध, पुरेशा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या बसस्थानकावर करण्याची नितांत आवश्यकता आहे. मुख्यतः संपूर्ण बसस्थानक व परिसर नियमित स्वच्छ केला जाईल, याचीच व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे.