स्थैर्य, सातारा, दि. 28 : वळसे परिसरात बी व्ही जी कंपनीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याकडेला कोरोना विषाणुच्या संसर्गापासुन वाचण्यासाठी वापरण्यात येणारे मास्क, हॅण्डग्लोब्ज पीपीई किट, वापरून कोणी अज्ञाताने उघडयावर फेकुन दिल्याने परिसरातील नागरीकामध्ये तसेच शेतकरी वर्गामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या वापरलेल्या किटामध्ये कोरोना विषाणुचा संसर्ग असल्यास याच्यापासुन नक्कीच धोका उद्भवनार आहे? आणि असे उचापतीखोर कृत्य करणाऱ्यास चांगलीच आद्दल घडवली पाहीजे अस मत जागरूक नागरीकांनी व्यक्त केले आहे. आधीच ग्रामिण भागात कोरोनाचा शिरकाव वाडु लागल्यामुळे हे वापरलेल पीपीई किट मास्क हॅण्डग्लोब असे उघड्यावर फेकुन दिल्याने चिंतेचा विषय ठरला आहे?