पंढरपूर ते घुमान  सायकल यात्रेचे फलटण येथे उत्स्फूर्त स्वागत


स्थैर्य, फलटण, दि. 6 नोव्हेंबर : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान (पंजाब) या अध्यात्मिक रथयात्रा व सायकलवारीचे रविवारी फलटण नगरीत आगमन झाले. यानिमित्ताने सवाद्य शोभा यात्रा काढण्यात आली होती. भागवत धर्म प्रसारक मंडळ, पालखी सोहळा पत्रकार संघ, श्री नामदेव दरबार कमिटी व समस्त नामदेव शिंपी समाजाच्यावतीने संत नामदेव महाराजांची 755 वी जयंती, श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा 729 वा संजीवन समाधी सोहळा व गुरुनानक देव यांच्या 556 व्या प्रकाश पर्वानिमित्त यंदा रविवार दि. 2 नोव्हेंबर ते बुधवार दि. 3 डिसेंबर 2025 दरम्यान 31 दिवसांची रथयात्रा व सायकल वारी आयोजित करण्यात आली आहे.

वारीचे हे चौथे वर्ष असून ही वारी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश व मध्यप्रदेश या आठ राज्यातून प्रवास करणार आहे. या वारीत 150 सायकलस्वार व 50 भजनी मंडळी सहभागी झाली आहेत. पंढरपूर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते या सायकल वारीचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर ही सायकलवारी फलटण येथील शिंपी समाज विठ्ठल मंदिर येथे मुक्कामी विसावली. तत्पूर्वी येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत वारीचे स्वागत करण्यात आले.

या वेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरबहाद्दर नाईक निंबाळकर, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव सचिन सूर्यवंशी (बेडके),सामाजिक कार्यकर्ते अमिरभाई शेख, दशरथ फुले, अ‍ॅड. ऋषीकेश काशीद, राजू देशमाने, नंदकुमार मोरे, पत्रकार बाळासाहेब ननवरे, किरण बोळे, युवराज पवार यांच्यासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते

क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथून सवाद्य शोभा यात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून विठ्ठल मंदिर पर्यंत काढण्यात आली. संत सावतामाळी महाराज येथे संत नामदेव व संत सावतामाळी अशी संतभेट करण्यात आली. राजुरी ता.फलटण येथे ही संत साधुबुवा यांची संतभेट करण्यात आली. यावेळी जेष्ठ पत्रकार सुभाष भांबुरे, विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेश हेंद्रे, नामदेव समजोन्नती परिषदेचे अध्यक्ष करण भांबुरे, महिला मंडळ अध्यक्ष सुलभाताई मोहोटकर, अविनाश कुमठेकर, महेश हेंद्रे, मोहन जामदार, विजय उंडाळे, श्रीकांत मुळे, सुनील पोरे, शेखर हेंद्रे, मृणाल पोरे, मंगेश पोरे, विजय कुमठेकर, राहुल जामदार, डॉ राजेंद्र हेंद्रे, बापू गाटे, दिगंबर कुमठेकर, दत्तात्रय पवार, रामचंद्र हेंद्रे, संतोष बाचल, संत नामदेव महिला मंडळाच्या उपाध्यक्षा सौ अंजली कुमठेकर,अश्विनी हेंद्रे यांच्यासह विठ्ठल मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.

संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या श्री क्षेत्र पंढरपूर ( महाराष्ट्र ) या जन्मभूमी ते तिर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र घुमान ( पंजाब ) या कर्मभूमी पर्यंत भागवत धर्म प्रसारक मंडळ , पालखी सोहळा पत्रकार संघ , श्री नामदेव दरबार कमिटी घुमान व देशभरातील विविध नामदेव शिंपी समाज संघटनांच्या वतीने शांती ,समता व बंधूता या संत विचारांचा व संत साहित्याचा प्रचार व प्रसार करीत श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान अशी रथ व सायकल यात्रा काढण्यात आली होती.

महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, दिल्ली, हरियाणा, पंजाब, राजस्थान व गुजरात या राज्याचा एक महिन्याचा दौरा करुन ही यात्रा फलटण नगरीत दाखल झाली. श्रीराम मंदिरात या रथयात्रेचे स्वागत करण्यात आले. श्रीराम मंदिरात संत नामदेव महाराजांच्या पादुकांची पूजा व आरती करण्यात आली. त्यानंतर श्रीराम मंदिर ते श्री विठ्ठल मंदिर अशी रथयात्रा काढण्यात आली.

श्री विठ्ठल मंदिरात पादुकांची पूजा व अभिषेक राजेश हेंद्रे यांनी सपत्नीक केला. घुमाण यात्रेत सहभागी सायकल यात्रींचा व भजनी मंडळाचा शाल व श्रीफळ देवून सुभाष भांबुरे व मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी सूर्यकांत भिसे यांच्यासह वारकरी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!