पंचपाळी हौद दुर्गामाता मंदिर तर्फे तेरा लाख जपाचा संकल्प


स्थैर्य, 16 फेब्रुवारी, सातारा : सर्व भावीक भक्तांना कळविण्यास आनंद होत आहे की पंचपाळी हौद दुर्गामाता मंदिर राजवाडा ट्रस्टतर्फे गुरुवार दि. 19/2/26 सकाळी 6 वाजले पासुन ते 20/2/26 रोजी सकाळी 6 वाजेपर्यत म्हणजे 24 तासात देवी मातेचा ‘ ऊॅ ऐं ह्रिं क्लीं चामुण्डायै विच्चे नम:’ या मंत्राचा 13 लाख जप करणेचा संकल्प पंचपाळी देवी मदीरांत येऊन करणेचा आहे व तसा संकल्प ट्रस्टी यांचे मार्फत सोडण्यात आला आहे.

या उपक्रमात भाग घेण्यासाठी मंदिरात नाव नौंदणी करावी. ज्यांना खुर्ची वर बसून जप करणेचा असेल त्यांचे करता खुर्ची, तसेच, जपमाळ, पाणी बॉटल अल्पोपहार, ट्रस्टीमार्फत देण्यात येईल तसेच स्वत:ची नेहमी वापरात असेल माळ तर तीच बरोबर घ्यावी.पुरुषांसाठी करता सायंकाळी 7 ते रार्त्रीतील कोणतीही वेळ घेतली तरी चालेल. अती वयस्कर मंडळीनी दिवसातील कोणतीही वेळ दिली तरी चालेल. जपासाठी कमीत कमी 1 तास जास्ती जास्त कीतीही वेळ देउ शकता.

पंचपाळी हौद येथील मंदीरात बसुन केलेला जप तेथे सांगुन नोंद करुन घेण्याचे आवाहन पंचपाळी हौद दुर्गामाता मंदिर चारिटेबल ट्रस्ट विश्वस्त व कार्यकारीणी सदस्य सातारा अध्यक्ष श्री धनंजय देशमुख तसेच अधिक माहितीसाठी संपर्क : प्रशांत तुपे, तेजस जाधव 8888320284, हिमांशु निकम 9881297622 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!