दैनिक स्थैर्य । दि. १० ऑगस्ट २०२३ । मुंबई । स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमाचा सांगता सोहळा ९ ऑगस्ट पासून सुरु झाला आहे. यानिमित्त केंद्र शासनाच्या निर्देशानुसार आयोजित ‘माझी माती माझा देश’ (मेरी माटी मेरा देश) उपक्रमांतर्गत विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांच्या उपस्थितीत पंचप्रण शपथ घेण्यात आली.
पंचप्रण शपथ
‘आम्ही शपथ घेतो की, भारतास २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करु. गुलामीची मानसिकता मूळापासून नष्ट करु. देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करु. भारताची एकात्मता बलशाली करु आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगू. देशाचे नागरीक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करु.’
या उपक्रमात उपायुक्त जगदीश मिनियार यांच्यासह विविध शाखांचे अधिकारी तसेच कार्यालयातील कर्मचारी सहभागी झाले.