पी-उत्तर विभागाचा ‘कोरोना’ विरोधात लढण्यासाठीचा कृतिआराखडा तयार – ना.अस्लम शेख

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

कंटेटमेंट झोनमध्ये स्क्रिनिंग करण्यासाठी पालिकेच्या २० टीम सक्रिय.. 

स्थैर्य, मुंबई, दि. 12 : महानगरपालिका पी- उत्तर विभागामध्ये कंटेंटमेंट झोन असणाऱ्या ठिकाणी ‘स्किनिंग’ करण्यासाठी डॉक्टर्स व वैद्यकिय कर्मचाऱ्यांच्या वीस टिम तयार करण्यात आल्या असून  प्रत्येक इमारतीत व झोपडपट्ट्यांधील प्रत्येक घरामध्ये जाऊन लोकांच्या  वैद्यकिय तपासण्या केल्या जाणार असल्याची माहिती मुंबई शहरचे पालकमंत्री ना. अस्लम शेख यांनी दिली.

पी-उत्तर विभागात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. या पार्श्वभूमिवर शुक्रवारी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पी-उत्तर कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीनंतर ना.अस्लम शेख माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत सहाय्यक मनपा आयुक्त  संजोग कबरे, पालिका उपायुक्त रंजित ढाकणे , वैद्यकिय अधिकारी श्री. बारस्कर  व पालिकेचे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ना. शेख म्हणाले की, सार्वजनिक शौचालयांचे दिवसातून सहा ते सात वेळा निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. कंटेंटमेंट झोनमध्ये वैद्यकिय शिबीरे घेऊन लोकांच्या वैद्यकिय तपासण्या करण्यात येत आहेत. जीवनसत्त्व – सी गोळ्यांचे वाटपही करण्यात येत आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतर अशा स्वरुपाच्या केसेमध्ये वाढ होणार हे गृहित धरुन आधीपासूनच  विलगिकरण केंद्र व अन्य सर्व प्रकारच्या व्यवस्था करण्यात आल्याचे ना. शेख यांनी सांगितले.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!