नवजा येथील ओझर्डे धबधबा वाहू लागला


दैनिक स्थैर्य । 26 मे 2025। सातारा। पाटणसह कोयना परिसरात गेल्या आवडाभरापासून दिवस-रात्र पडत असलेल्या संततधार अवकाळी पावसामुळे मे महिन्यातन डोंगरदर्‍यातील छोटे-मोठे धबधबा वाहण्यास सुरुवात झाली आहे. पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारा धुक्यात हरवलेला नवजा येथील प्रसिध्द ओझर्डे धबधबा सह्याद्रीच्या कुशीतून फेसाळत वाहू लागला आहे. त्यामुळे आतापासूनच पर्यटकांची पावले या वळू लागली आहेत, तर संततधार पावसामुळे कोयनानगर परिसरने हिरवी चादर परिधान केल्याने कोयनेचा निसर्ग पर्यटकांना खुणावू लागला आहे.

सह्याद्रीच्या कडेकपारीतून उंचावरून फेसाळत कोसळणारे लहान-मोठे फवारे, चारी बाजूनी हिरवीगार झाडी व जंगल, पक्ष्यांचा किलबिलाट, अशा निसर्ग सौंदयचि वरदान लागलेला कोयना विभाग पर्यटकांव्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. निसगाँचा वरदहस्त लाभलेल्या कोयना भाग जून महिन्यात पडणार्‍या पावसामुळे पावसाच्या सरीने सदाहरित असलेला डोंगरकपारी सह परिसरात गर्द हिरवळीचा गालीचा व दाट धुक्याची दुलई पावसाच्या सरी अशा आल्हाददायक वातावरणात सह्याद्रीच्या रांगागपून पाटणच्या पश्चिमे कडील कुंभाली घाटापर्यंत सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर वाहणार्‍या जलधारा पावसाळ्यात पर्यटकांना खुणावत असतात.

जैवविविधतेने नटलेला समृद्ध निसर्ग व कोयना धरण, नेहरू गार्डन व शिवसागर जलाशयाचे छोट्या-छोट्या खोर्‍यातून विस्तारलेले पाणलोट क्षेत्र पर्यटकांचे आकर्षण उरते. या संपूर्ण निसर्गाचा अनुभव पर्यटकांना जून महिन्यात घेता येतो. मात्र सध्या पाटण ते कोयनानगर परिसरात गेल्या आठवडाभरापासून अवकाळी पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुझे तालुक्यात सर्वच ठिकाणी पावसाळासदृश वातावरण तयार झाले आहे. संततधार पावसामुळे ओढे, नदी, नाले, छोटे, मोठे देखील बाहू लागल्याचे दिसून येत आहे. कोयनेच्या वर्षा पर्यटनाचा केंद्रबिंदू असलेला ओझर्डे धबधबा हा जून महिन्याच्या शेवटच्या आठवडयापासून वाहण्यास सुरुवात होते. मात्र कोयना विभागात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे मे महिन्यातच ओझर्डे धबधबा प्रवाहित होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता हौशी पर्यटकांची पावले कोयनानगरच्या दिशेने वळू लागल्याचे चित्र दिसून येत आहे.


Back to top button
Don`t copy text!