दैनिक स्थैर्य | दि. २७ ऑक्टोबर २०२१ | सातारा | सातारा नगरपालिकेची निवडणूक जवळ आल्यापासून इनोव्हेंटिव साताऱ्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत . सध्या जे काही घडतयं ते यांच्यामुळेच अगदी साताऱ्याला ऑक्सीजनं हेच देतात अशी बोचरी टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी उदयनराजे यांच्यावर केली .
जिल्हा बँकेच्या दालनात शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकारांच्या अनेक प्रश्नाला राजकीयदृष्टया चपखलं उत्तरे दिली . ते पुढे म्हणाले, काही जण आपणच सर्व काही करत असल्याच्या भ्रमात आहेत . अगदी साताऱ्याला जो ऑक्सीजन मिळतो तो यांच्यामुळेच असा थेट हल्लाबोल शिवेंद्र राजे यांनी अगदी उदयनराजे स्टाईलने चुटकी वाजवत केला . महिनो महिने गायब असणारे पालिका निवडणुकीच्या तोंडावर नवा सातारा घडवू असे म्हणतात . जे काही करतात ते हेच बाकीचे कोणी काहीच करत नाही त्यामुळे ज्यांनी कधी जिल्हा बँकेत अगदी निवडणुकीच्या तोंडावर पाऊल टाकले ते सभासद हिताचा काय निर्णय घेणार ? बँकेचे प्रोसेडिंग तपासले तर यांची उपस्थिती आणि यांचे रजेचे अर्ज हे सर्वच समोर येईल . ज्यांनी सहकारी संस्था मोडकळीस काढल्या त्यांनी अर्ज माघारी घ्यावे असे आवाहन उदयनराजे यांनी दिले होते त्यावर बोलताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, त्या संस्थेच्या निवडणुकीला त्यांनी येऊन बोलावे . जिल्हा बँक चांगली चालली आहे याची कबुली . स्वतः उदयनराजे यांनी च दिली . त्यामुळे मोडकळीस आलेल्या संस्था हे विधानं जिल्हा बँकेच्या संदर्भात लागू होत नाही
सर्वसमावेशक पॅनेलमध्ये उदयनराजे असणार का ? व त्यांच्या नावाचा तुम्ही आग्रह धरणार का ? या प्रश्नावर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, राष्ट्रवादीच्या पॅनेलमध्ये मी आहे की नाही हेच मला माहित नाही . रामराजे नाईक निंबाळकर हे जिल्हयाचे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते व विधान परिषदेचे सभापती आहेत . राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार , उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या वरिष्ठ नेत्यांकडून काय तो अंतिम निर्णय होईल . त्यावर मी बोलू शकत नाही . उदयनराजे यांच्या विषयी मी काय बोलणार ते मोठे नेते आहेत , मी आपला एक सामान्य माणूस आहे त्यामुळे त्यांची जी काही राजकीय भुमिका असेल ती तुम्ही त्यांनाच विचार असा रोखठोक पवित्रा शिवेंद्रसिंहराजे यांनी घेतला.