स्थैर्य, फलटण, दि. १० : फलटण व बारामती तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना हॉस्पिटल मध्ये जाण्याकरिता रुग्णवाहिकेची उपलब्धता तिरंगा फाउंडेशनचे अध्यक्ष रणजित शिंदे यांनी केलेली आहे. ह्या उपक्रामधून रणजित शिंदे यांनी शेकडो रुग्णांना रुग्णवाहिका उपलब्ध करून दिलेली आहे. त्या बाबत रणजित शिंदे यांचे आभार कोरोनाबाधित रुग्ण व कुटुंबीय मानत आहेत. ह्या सोबतच तातडीच्या घरगुती वापरासाठी ऑक्सिजनची सुद्धा उपलब्धता रणजित शिंदे हे करून देत आहेत. रणजित शिंदे यांनी सुरु केलेला उपक्रम हा अंत्यत प्रेरणादायी असून आगामी काळामध्ये जर सर्वसामान्य नागरिकांना रुग्णवाहिकेची किंवा तातडीच्या ऑक्सिजनची आवश्यकता लागली तर तिरंगा फाउंडेशनचे अध्यक्ष रणजित शिंदे (मोबा.: 7769056555) यांच्याशी संपर्क साधण्यात यावा, असे आवाहन तिरंगा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेले आहे.
आपल्या भागामध्ये कोरोना लढाईसाठी भरभक्कम साथीची खुप गरज आहे. बऱ्याच लोकांना बेड मिळत नाहीत. ऑक्सिजनसाठी पण झगडावे लागत आहे. अशातच तिरंगा फाउंडेशनच्या वतीने गरजवंतांसाठी मदतीचा हात घेऊन आमही उभे राहिलेले आहोत. ज्यांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी व ऑक्सिजन पुरविण्याचे अनमोल कार्य आम्ही करीत आहोत. स्वतःच्या जीवाची परवा न करता जनतेच्या मदतीसाठी मोलाचं कार्य असच आगामी काळामध्ये सुरु राहावे. कोरोनाच आलेलं संकट हे लवकरात लवकर जावे, असे मत तिरंगा फाउंडेशनचे अध्यक्ष रणजित शिंदे यांनी व्यक्त केले.