स्थैर्य, फलटण, दि. 27 : कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या सुचनेनुसार फलटण नगरपरिषदेच्या नगरसेविका सौ. सुवर्णा अमरसिंह खानविलकर यांच्या पुढाकाराने प्रभाग क्रमांक 10 मध्ये लॉकडाउनच्या काळात फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचा फिरता दवाखाना आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात आला. सर्वप्रथम आरोग्य तपासणीसाठी आलेल्या नागरिकांचे टेम्परेचर स्कॅनर द्वारे स्क्रिनींग करण्यात आले. मास्क परिधान केले असल्याची खात्री करून सॅनिटायझर देऊन अत्यंत शिस्तबद्ध आणि सोशल डिस्टन सिंग पाळुन आरोग्य तपासणी व मोफत औषध उपचार उपक्रम राबविण्यात आला. यावेळेस उपस्थित सर्व नागरिकांची नाव नोंदणी करणेत आली. या ठिकाणी डॉ.वल्लभ कुलकर्णी, डॉ.धनश्री शिराळकर व बाजार समितीच्या स्टाफला गुलाबपुष्प देऊन नगरसेविका सौ. खानलिकर यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.
सदरील उपक्रम राबविताना बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रभागातील लोकांना कोरोना म्हणजेच काव्हिड 19 या बाबत जनजागृती करण्यात आली. लोकांना आरोग्य विषयक सोयी सुविधा फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने त्यांचे डोअर स्टेपला देणेत आली या सुविधेचा 402 नागरिकांनी लाभ घेतला व नागरिकांनी श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व बाजार समितीच्या संपुर्ण टिमचे आभार मानले.