दैनिक स्थैर्य । दि. २१ फेब्रुवारी २०२३ । पुणे । महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांनी सोमवार दिनांक 20/2/2023 रोजी पुणे येथे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचे ऊमेदवार श्री.हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी आलेले होते यावेळी त्यांनी अनेक समाजासोबत व अनेक घटका सोबत जाहीर सभा न घेता आर सी एम कॉलेज ,सभागृहात प्रत्यक्ष सायंकाळी 6 वाजता छोटी ,छोटी बैठक केली.या बैठकीत माळी समाज आणि ओबीसी समाजातील अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.
अखिल भारतीय संत सावतामाळी महासंघ आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघ व इतर ओबीसी घटकामाफर्त भिडे वाडा,ओबीसी जनगणना,फुले दाम्पत्य सयुक्तिक भारतरत्न , शासनाने महात्मा फुले जीवनावरील चित्रपट लवकर काढावा आणि अल्प दरात महापूर्षांचे साहित्य तसेच ओबीसी शिष्यवृत्ती ज्या त्या वर्षीच वितरण व्हावी आणि निर्वाह भत्ता सुरू करावा या अनेक प्रश्नाचे निवेदन मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे साहेब यांना दिले असता त्या निवेदनास सकारात्मक जाहीर उत्तरे दिले सोबत शिंदे साहेब म्हणाले की भिडे वाड्यात भारतातील पहिली शाळा सुरू झाली असून त्याचे लवकरच राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करू ते आमचे महत्वाचे काम असणार असून ती आमची व आपल्या सर्वांची अस्मिता आहे.
यावेळी निलेश गिरमे,राहुल भुजबळ ,यांचे शुभ हस्ते फुले दाम्पत्य अर्ध पुतळे भेट दिले तर सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचे शुभहस्ते महात्मा फुले पगडी घालून आणि उपरणे तसेच ढोक लिखित ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले मराठी,हिंदी, इंग्रजी,आणि जर्मन भाषेतील जीवनचरित्र व डॉ.वडगावकर लिखित महात्मा फुले गीतचरित्र भेट देऊन सन्मान केला.
मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढे सदरच्या विविध समाज, उद्योजक , संघटना ,विविध घटक यांना म्हणाले की आपला कार्यकर्ता /प्रतिनिधी म्हणून या सरकार मधे काम करीत असल्याने माझे कडे पाहून उमेदवार परिचय,भेट झाली नाही तरी देखील मतदान करून मावळ आणि कसबा मतदारांसंघाकडे लक्ष देखील द्यावे असे शिंदे साहेबांनी आव्हान केले .
या प्रसंगी किरण साळी.प्रमोद नाना भानगीरे.रमेश कोंडे.अजय भोसले.गणेश काची.अविनाश खेडेकर उपस्थित होते तर
कार्यक्रमाचे नियोजन युवा सेना पुणे शहराध्यक्ष निलेशजी गिरमे यांनी केले होते.