केंद्र सरकार मान्यताप्राप्त उस्मानाबादी बोकड व गोठवलेले वीर्य फलटणमध्ये उपलब्ध

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


उस्मानाबादी शेळ्यांचे कळप किंवा बंदिस्त फार्म ज्यांच्याकडे आहेत; त्यांना आवाहन करू इच्छितो की कृपया संस्थेशी संपर्क साधावा. संस्थेतर्फे भारत सरकारच्या भारतीय कृषि संशोधन परिषद, नवी दिल्ली या संस्थेच्या अर्थसहाय्याने अखिल भारतीय समन्वित शेळी सुधार प्रकल्पांतर्गत उस्मानाबादी शेळी सुधारणा योजना गेली १५ वर्षे राबविली जात आहे.

संस्थेकडे उच्च दर्जाचे निवडक उस्मानाबादी बोकड व गोठवलेले वीर्य उपलब्ध आहे. त्यांचा वापर गावांमधील शेळ्यांच्या आनुवंशिक सुधारणेसाठी अहमदनगर, बीड, सोलापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यांमध्ये केला जात आहे. प्रकल्पाशी जास्तीतजास्त उस्मानाबादी शेळी पालक संलग्न व्हावेत ह्या दृष्टीने कृपया खालील संपर्क क्रमांक किंवा ईमेलवर संपर्क साधावा.

निंबकर कृषि संशोधन संस्था,

पशु संवर्धन विभाग,

लोणंद रोड, वडजल, फलटण.

ईमेल: nimsheep@gmail.com

ऑफिस संपर्क क्र – ७५८८६८५८६७

उस्मानाबादी प्रकल्प व्यवस्थापक: मंगेश सोनवलकर – ८००७७८६३७४


Back to top button
Don`t copy text!