उस्मानाबादी शेळ्यांचे कळप किंवा बंदिस्त फार्म ज्यांच्याकडे आहेत; त्यांना आवाहन करू इच्छितो की कृपया संस्थेशी संपर्क साधावा. संस्थेतर्फे भारत सरकारच्या भारतीय कृषि संशोधन परिषद, नवी दिल्ली या संस्थेच्या अर्थसहाय्याने अखिल भारतीय समन्वित शेळी सुधार प्रकल्पांतर्गत उस्मानाबादी शेळी सुधारणा योजना गेली १५ वर्षे राबविली जात आहे.
संस्थेकडे उच्च दर्जाचे निवडक उस्मानाबादी बोकड व गोठवलेले वीर्य उपलब्ध आहे. त्यांचा वापर गावांमधील शेळ्यांच्या आनुवंशिक सुधारणेसाठी अहमदनगर, बीड, सोलापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यांमध्ये केला जात आहे. प्रकल्पाशी जास्तीतजास्त उस्मानाबादी शेळी पालक संलग्न व्हावेत ह्या दृष्टीने कृपया खालील संपर्क क्रमांक किंवा ईमेलवर संपर्क साधावा.