स्थैर्य, मुंबई, दि.३०: ओरिफ्लेम या आघाडीच्या स्वीडिश ब्युटी ब्रँडने आदर्श ठरावेत अशी अनेक उत्पादने गेल्या काही वर्षात सादर केली आहेत. टेंडर केअर हे यापैकीच सर्वाधिक लोकप्रिय उत्पादनांपैकी एक ठरले आहे. १९७९ मध्ये आणलेला हा मुलायम बाम मागील ३५ वर्षांपासून ओठ आणि कोरड्या त्वचेला संरक्षण देत त्याची काळजी घेत आहे. ओरिफ्लेमने आता ऑरेंज सीड ऑइलसह नवा टेंडर केअर प्रोटेक्टिंग बाम सादर केला आहे.
गोड आणि रसाळ फळात भरपूर आरोग्यदायी घटक असून ऑरेंज सीड ऑइल हे फॅटी अॅसिडने समृद्ध अशते. यामुळे कोरड्या त्वचेचे पोषण होते. त्वचा मऊ, हायड्रेट आणि मुलायम ठेवण्यास मदत होते. तुमचे ओठ, कोपर, हात किंवा त्वचेच्या कोरड्या भागाचे संरक्षण करण्यासाठी टेंडर केअर हे परिपूर्ण उत्पादन आहे.
ऑरेंज सीड ऑइलमधील शक्तीशाली अँटीऑक्सिडंट आणि रिफ्रेश करणाऱ्या गुणधर्मांसह, नव्या टेंडर केअरमध्ये बीसवॅक्सचा समावेश आहे. हे संपूर्ण नैसर्गिक मेण सुखदायक आणि मऊपणाच्या गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे. हे त्वचेला संरक्षण देते, हायड्रेट ठेवते आणि ई जीवनसत्त्वाच्या भरपूर प्रमाणामुळे फ्री रॅडिकल्सवर मात करते. त्वचेच्या वरील थरांवर खोलवर हायड्रेटिंग केल्याने त्वचा मऊ आणि आरामदायी ठेवली जाते.
ओरिफ्लेमचे प्रवक्ते म्हणाले, “ओरिफ्लेममध्ये, ग्राहकांना नव्या ब्रँडचे, रसाळ आणि ताजे टेंडर केअर देताना आम्हाला खूप आनंद होत आहे. ऑरेंज सीड ऑइलसह असलेला टेंडर केअर प्रोटेक्टिंग बाम कोरड्या त्वचेला, उन्हामुळे प्रभावित झालेल्या संरक्षण देते. क्लासिकप्रमाणेच या नव्या उत्पादनालाही भरपूर प्रेम मिळेल, याची आम्हाला खात्री आहे.”